AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharshtra News LIVE : रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी दीपाली सय्यद आणि 19 जणांवर गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Aug 24, 2026 | 4:58 PM
Share

अमरावतीमध्ये आज पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागून तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सरकार साखर आयात करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharshtra News LIVE : रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी दीपाली सय्यद आणि 19 जणांवर गुन्हा दाखल

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Aug 2026 04:58 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रीकल बुलेटप्रुफ गाडीचा समावेश

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रीकल बुलेटप्रुफ गाडीचा आजपासून समावेश झाला आहे.  मुख्यमंत्री फडणवीस यांची नवी गाडी चर्चेचा विषय ठरली आहे.  काही दिवसांपुर्वी त्यांनी बुलेट बाईकने वर्षा ते मंत्रालय असा प्रवास केला होता .

  • 24 Aug 2026 04:37 PM (IST)

    अमरावतीत तब्बल 26 दिवसानंतर पावसाची हजेरी

    अमरावतीत तब्बल 26 दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे.  पाऊस नसल्याने बळीराजा संकटात सापडला होता, मात्र आता पाऊस आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र धरण क्षेत्राला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

  • 24 Aug 2026 04:29 PM (IST)

    आमचं सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणारं आहे – एकनाथ शिंदे

    आमचं सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणारं आहे, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत झाल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी साधला संवाद. तरूणाईच्या हाताला काम दिलं पाहिजे, तरूणांना  उद्योगातही काम मिळालं पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत, असं शिंदे म्हणाले.

  • 24 Aug 2026 04:24 PM (IST)

    पुणे – गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत गोंधळ

    पुणे  – गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत गोंधळ झाला.  पर्यावरणवादी व्यक्तीने ढोलताशाला विरोध केल्याने मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

    ढोलताशाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला बैठकीतुन कार्यकर्ते व पोलिसांनी बाहेर काढलं .

  • 24 Aug 2026 04:16 PM (IST)

    रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल

    राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर  पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह आणखी काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • 24 Aug 2026 04:13 PM (IST)

    पुण्यातील गणेश उत्सवाच्या संदर्भात गणेश मंडळे व प्रशासनाची संयुक्त गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीस सुरुवात

    पुण्यातील गणेश उत्सवाच्या संदर्भात गणेश मंडळे व प्रशासनाची संयुक्त गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीस सुरुवात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळाची बैठक झाली.  गणेशोत्सव काळात पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणा संदर्भात काही नियम लागू केल्याने यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 24 Aug 2026 04:02 PM (IST)

    मुंबई महापालिकेच्या गेट वर कामगारांचे आंदोलन

    मुंबई महापालिकेच्या गेट वर म्युन्सिपल कामगार संघाकडून आंदोलन करण्यात येत आहे.  कामगार संघांचे सरचिटणीस सतीश राजगुरु, उपाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, वंचित चे चेतन अहिरे आयुक्त आश्विनी भिडे यांना भेटण्यासाठी गेले आहेत.

  • 24 Aug 2026 04:00 PM (IST)

    मुळशीकरांना पिण्याचे 2 टीएमसी पाणी कायमस्वरूपी मिळावे यासाठी उपोषण

    मुळशी धरण संदर्भात गेल्या 100 वर्षांपासून ज्या मागण्या आणि मुळशीकरांना पिण्याचे 2 टीएमसी पाणी कायमस्वरूपी मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमित कंधारे यांनी आठ दिवस उपोषण केलं होतं यासंदर्भात माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मध्यस्थी करून चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सोडवण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा कंपनीच्या व्यवस्थापनाची उच्चस्तरीय बैठक लावून त्यावरती तोडगा काढला जाईल असं आश्वासन चंद्रकांत दादा पाटील यांनी अमित कंधारे यांना दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं होतं

  • 24 Aug 2026 03:50 PM (IST)

    आम्ही काय OBC च्या विरोधात नाही मी रियल बोलत आहे–मनोज जरांगे पाटील

    मी तुमच्या हिताचे सांगतोय पारदर्शक व 28 तारखेपर्यंत ही आहे. आम्ही काय OBC च्या विरोधात नाही मी रियल बोलत आहे. सरकारने खरा आकडा सांगितला होता 382 प्रमाणपत्र आणि वाटले. साहेब आले आणि म्हटल्या अठरा हजार वाटले, सरकारी अधिकारी हसवत आहेत का? तरी माझा फेस पाडला त्यांनी असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.

  • 24 Aug 2026 03:40 PM (IST)

    ज्या नोंदी सापडले आहेत त्याची यादी ग्रामपंचायतवर लावा-मनोज जरांगे पाटील

    ज्या नोंदी सापडले आहेत त्याची यादी ग्रामपंचायतवर लावा. सोपं करत नाहीत म्हणून ही सगळी मरमर चालू आहे.शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ग्रामपंचायतीला घेतले आता बंद पडले. मी वाशी ला गेलो तेव्हा स्पष्ट विचारलं किती कुणबी नोंदणी सापडल्या ते सांगा त्यावेळी सांगितलं 54 लाख होते. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो तेव्हा शिंदे समितीने सांगितलं 58 लाख झाल्या सांगितले. 58 लाख नोंदीच्या याद्या चिपटून टाका आणि प्रमाणपत्र द्या असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 24 Aug 2026 03:30 PM (IST)

    58 लाख नोंदी दिल्यात आम्ही म्हणतोय प्रमाणपत्र द्या -मनोज जरांगे पाटील

    58 लाख नोंदी त्यांनी शोधल्या ज्या जुन्याच होत्या त्या नव्याने शोधल्या आहेत.तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्ही म्हणतोय प्रमाणपत्र द्या , असे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी केली.

  • 24 Aug 2026 03:20 PM (IST)

    अमरावतीमधील दुर्घटनेची चौकशी होणार

    अमरावती मधील नवजात शिशूच्या मृत्यूच्या सखोल चौकशी साठी समिती गठीत करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आठ दिवसात त्या समितीचा अहवाल समोर येईल

  • 24 Aug 2026 03:10 PM (IST)

    आकृतिबंधाविरोधात इगतपुरीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवेदन

    कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात इगतपुरीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. प्रस्तावित आकृतिबंध रद्द करून सर्वसमावेशक आकृतिबंध तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने शेतकऱ्यांच्या सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आदिवासीबहुल व भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण इगतपुरी तालुक्यात मनुष्यबळ अपुरे पडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • 24 Aug 2026 03:00 PM (IST)

    सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल

    सरकारचे शिष्ट मंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामांत, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रसाद लाड अंतरवालीत दाखल झाले आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

  • 24 Aug 2026 02:55 PM (IST)

    संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्या

    संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्या. पाच कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा ग्राहकाचा दावा. दोन कचोरी मुलांनी खाल्ल्याचाही ग्राहकाचा आरोप. वैजापूर शहरातील कचोरी सेंटरमधील धक्कादायक प्रकार

  • 24 Aug 2026 02:41 PM (IST)

    मुंबईत कांदिवलीमध्ये मराठी रिक्षाचालकाला मारहाण

    मुंबईत कांदिवलीमध्ये मराठी रिक्षाचालकाला मारहाण. कांदिवलीत परप्रांतीय रिक्षाचालकांची मुजोरी, मनसे आक्रमक. रिक्षा चालवू नका असं आंदोलक रिक्षा चालकांनी सांगितलं पण नकार दिल्यानंतर आपल्याला 3-4 अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण केल्याचा आरोप मराठी रिक्षा चालकाने केलाय. दरम्यान, मुजोरी केली तर मोडून काढेन, मंत्री सरनाईकांचा इशारा

  • 24 Aug 2026 02:30 PM (IST)

    माझगावमध्ये गणपती आगमनावेळी दोन गटात तणाव

    माझगावमध्ये गणपती आगमनावेळी दोन गटात तणाव. माझगावचा मोरया गणपतीच्या आगमन सोहळ्यात झालेल्या गोंधळानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल. आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीवर एका सोसायटीतून अंडी फेकल्याचा आरोप. सध्या माझगाव परिसरात शांततापूर्ण वातावरण. हिंदुत्ववादी सरकार असताना असे प्रकार सहन करणार नाही- राणे

  • 24 Aug 2026 02:24 PM (IST)

    दहिसरमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची मराठी रिक्षाचालकांवर दादागिरी

    दहिसरमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची मराठी रिक्षाचालकांवर दादागिरी. स्टेशनला तू रिक्षा का चालवतो, अमराठी रिक्षाचालकांची दादागिरी. जबरदस्ती रिक्षाचालकांना रिक्षा बंद करायला आरोप

  • 24 Aug 2026 02:15 PM (IST)

    आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल

    आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल. अमरावतीत स्त्री जिल्हा रुग्णालयाला आग, 3 बाळांचा मृत्यू. पहाटे 3.30च्या सुमारास आग लागल्याची माहिती. नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग. 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु

  • 24 Aug 2026 01:55 PM (IST)

    जामखेड शहराच्या आनंद मेळाव्यात थरार!

    जामखेड शहराच्या आनंद मेळाव्यात थरार! हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून तरुणी खाली कोसळली. नागेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यात शनिवारी रात्री काळजाचा ठोका चुकवणारी घडली घटना तर घटनेचा व्हिडीओ व्हायरलं. पाळण्यातील एका खुर्चीची लोखंडी सुरक्षा कडी अचानक उघडल्याने घडली भीषण घटना. घटना घडताच तरुणीला तातडीने शासकीय रुग्णालयात केले दाखल तर प्रकृती स्थिर मात्र तरुणीला झाली गंभीर दुखापत पाळणा हवेत वेगाने फिरत असतानाच सुरक्षा कडी उघडली आणि तरुणी खाली कोसळली. अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • 24 Aug 2026 01:52 PM (IST)

    स्मार्ट मीटर आपल्यासाठी घातक- अनिल देशमुख

    अनिल देशमुख म्हणाले की, हे स्मार्ट मीटर आपल्यासाठी घातक आहे. स्मार्ट मीटर ची योजना बंद करा अशी मागणी विधानसभा मध्ये केली होती. स्मार्ट मीटर जबरदस्तीने लावणार नाही असं सांगितलं मात्र जबरदस्त ने स्मार्ट लावले जात आहे

  • 24 Aug 2026 01:48 PM (IST)

    वसंत डावखरे मानहानी प्रकरणात आज अंतिम युक्तिवाद

    वसंत डावखरे मानहानी प्रकरणात आज अंतिम युक्तिवाद; उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यासह आरोपीं वकीलाकडून तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्न, 9 सप्टेंबरला निकालाची शक्यता !

    ▪️ कल्याण न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संतोष आगे यांच्या दालनात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण.

    ▪️ १७ वर्षांपासून सुरू असलेला मानहानी खटला अंतिम टप्प्यात; आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष.

    ▪️ 2009 लोकसभा निवडणुकीतील कथित व्हिडिओ प्रकरणी दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात दाखल केला होता खटला.

    ▪️ अॅड. जयेश वाणी यांचा दावा – ही केस आरोपींना फसवण्यासाठी आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी दाखल करण्यात आली.

    ▪️ तक्रार 25 तारखेला दाखल झाली, मग पोलिसांनी तीन दिवस आधीच साक्षी आणि तपास कसा केला, असा सवाल न्यायालयात उपस्थित.

    ▪️ 22 तारखेला सभा आणि त्याच दिवशी साक्षी नोंदवल्या गेल्या, मात्र तक्रार 25 तारखेला दाखल झाल्याने तपासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह.

    ▪️ कथित सीडीच्या अस्तित्वावरच शंका; एक नव्हे तर अनेक सीडी असल्याची शक्यता बचाव पक्षाकडून व्यक्त.

    ▪️ फॉरेन्सिक तपासणीसाठी सीडी पाठवण्याच्या तारखांमध्ये विसंगती; दोन तारखांची नोंद असूनही अहवाल मात्र एकच.

    ▪️ सीडी दोनदा पाठवली गेली असेल तर दोन अहवाल असायला हवेत; पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याची शंका व्यक्त.

    ▪️ उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे घटनास्थळी उपस्थित असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद.

    ▪️ चौघांनाही खोट्या पद्धतीने गोवून निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप.

    ▪️ रमाकांत देवळेकर यांच्या वकिलांचा दावा – सभेच्या परवानगी पत्रावर सही नव्हती, तरीही गुन्ह्यात अडकवण्यात आले.

    ▪️ 2009 पासून खोट्या प्रकरणात अडकवले गेल्याचा दावा; सर्व आरोपींच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेची मागणी.

    ▪️ कलम 313 अंतर्गत जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण; 9 सप्टेंबरला निकाल लागण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष खटल्याकडे.

  • 24 Aug 2026 01:43 PM (IST)

    एक देश एक निवडणूक मुद्यावर गठीत संयुक्त संसदीय समितीवर आज बैठक

    एक देश एक निवडणूक मुद्यावर गठीत संयुक्त संसदीय समितीवर आज बैठक होणार आहे.  पद्म पुरस्कार विजेते तसेच दोन प्रमुख संशोधन संस्थांशी चर्चा होणार आहे, संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी.पी. चौधरी यांनी माहिती दिली आहे.

  • 24 Aug 2026 01:38 PM (IST)

    फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाल्याने फायरिंगची घटना

    फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पती आणि पत्नी यांचे सोबत कौटुंबिक वाद झाल्याने फायरिंग ची घटना घडलेली आहे .घटनास्थळावर पती अथवा त्याची पत्नी नाही. उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरती रक्त सांडलेले असून वेपन व एक पुंगळी पडलेली आहे

  • 24 Aug 2026 01:32 PM (IST)

    विलेपार्ले परिसरातून धक्कादायक प्रकार

    मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विलेपार्ले परिसरात एका जीम ट्रेनरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीनेच विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित जीम ट्रेनर विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी यापूर्वी क्रीडा विश्वात कार्यरत होता आणि 2023 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

  • 24 Aug 2026 01:28 PM (IST)

    पुणे पालिकेतील निधी वाटपाचा वाद अद्यापही कायम

    पुणे पालिकेतील निधी वाटपाचा वाद अद्यापही कायम आहे, या संदर्भात राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. पालिकेला राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे.

  • 24 Aug 2026 01:23 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात दोन रात्र मुसळधार पावसाचा गावकऱ्यांना फटका

    गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात व छत्तीसगड राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे_भामरागड तालुक्यातील संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग पार्लकोटा नदीला पूर आल्यामुळे बंद. सध्या इंद्रावती आणि पार्लकोटा अशा दोन नद्यांना पूर वाढत असल्यामुळे सध्या भामरागड येथील राष्ट्रीय महामार्ग दोन ठिकाणाहून बंद पडलेला आहे. आलापल्ली सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग ही नंदिगाव पासून बंद पडला. मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पूर आल्यामुळे दोन तासापासून वाट बघत आहेत. कालपासून गडचिरोली जिल्ह्यात दोन रात्र मुसळधार पाऊस होता या पावसाच्या फटका अनेक नदीवर नाल्यांना बसलेला आहे

  • 24 Aug 2026 01:17 PM (IST)

    मी आता जास्त काम करु शकत नाही- नितीन गडकरी

    मी आता जास्त काम करु शकत नाही, ज्यावेळी करु शकलो तेव्हा केले, नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे असं नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे.

  • 24 Aug 2026 01:14 PM (IST)

    मनसेकडून कांदिवलीमधील उत्तर भारतीय रिक्षाचालकांच्या मराठी सक्ती आंदोलनाला विरोध

    मनसे नेते दिनेश साळवी हे मनसे कार्यकर्त्यांसह रिक्षांची वास्तविकता तपासण्यासाठी कांदिवली रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहेत. आज कांदिवलीमध्ये उत्तर भारतीय रिक्षाचालकांनी मराठी सक्तीच्या विरोधात आंदोलन करत रिक्षा संप पुकारला आहे मनसेने याला विरोध केला असून रिक्षा सेवा पुन्हा सुरू करत आहे.

  • 24 Aug 2026 01:10 PM (IST)

    परप्रांतीय रिक्षाचालकांची मुजोरीवर मनसे आक्रमक

    मुंबईत कांदिवलीमध्ये मराठी रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली, कांदिवलीतील परप्रांतीय रिक्षाचालकांची मुजोरी पाहयाला मिळाली आहे यामुळे आता मनसे आक्रमक झाली आहे.

  • 24 Aug 2026 01:05 PM (IST)

    भुजबळांच्या येवला मतदारसंघात भाजपचा बॅनर चर्चेचा विषय

    नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीनंतर येवल्यातील भाजपच्या बॅनरची जोरदार चर्चा. छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भाजप युवा मोर्चाकडून गिरीश महाजनांना शुभेच्छा. “आता कसं भाऊ… म्हणतील तसं…” या मजकुराने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष. शुभेच्छा बॅनरमधून नेमका कोणता राजकीय संदेश? येवल्यात चर्चांना उधाण. भुजबळांच्या येवला मतदारसंघात भाजपचा बॅनर चर्चेचा विषय.

  • 24 Aug 2026 12:57 PM (IST)

    कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता

    कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या यादीत तब्बल ६ लाख ३० हजारांच्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांसाठी एकूण ५ हजार ८० कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती आहे. मागील २ याद्यांमधे तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. केवायसी मुळे कर्जमाफीचा लाभ न मिळू शकलेल्या जवळपास १ लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

  • 24 Aug 2026 12:42 PM (IST)

    हिंगोलीत आमदार बांगर यांच्या कावड यात्रेला सुरुवात

    हिंगोलीत आमदार बांगर यांच्या कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले आहेत. कळमनुरी ते हिंगोली 18 किलोमीटर शिवभक्त पायी चालत जाणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रकाश आंबीडीकर कावड यात्रेत सहभागी होणार आहेत. हिंगोली शहरातील ओम अमृत धारा कयाधू महादेव मंदिरात कावड यात्रेचा समारोप होणार आहे.

  • 24 Aug 2026 12:32 PM (IST)

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यात बैठक सुरू

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यात बैठक सुरू आहे. ऑटो रिक्षा चालकांच्या विविध समस्यांबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. अमराठी रिक्षा चालकांवर परिवहन विभागाकडून सुरू झालेल्या कारवाईसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका महत्त्वाची असेल.

  • 24 Aug 2026 12:27 PM (IST)

    नोंदी सापडल्यानंतर सरकारला प्रमाणपत्र द्यावंच लागेल- मनोज जरांगे

    मराठा आणि कुणबींच्या लेकरांचं वाटोळं करू नका. मराठा आणि ओबीसींमध्ये दुरावा निर्माण करणं बंद करा. नोंदी सापडल्यानंतर सरकारला प्रमाणपत्र द्यावंच लागेल, असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 24 Aug 2026 12:25 PM (IST)

    मनोज जरांगे यांची 29 ऑगस्टपासून आंदोलनाची भूमिका

    कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचं काम बंद करा. मंत्री, आमदारांनी मराठा- कुणबीचं नुकसान करू नये. आमची फसवणूक करत आहेत, हे आमच्या लक्षात येतंय. कारण नसतानाही मी कुणावरही बोलत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 24 Aug 2026 12:17 PM (IST)

    रिक्षा आणि टॅक्सी चालकांविषयी अनेक तक्रारी- प्रताप सरनाईक

    जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर करा, तुमचं स्वागतच आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांविषयी अनेक तक्रारी समोर येत आहेत, असं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

  • 24 Aug 2026 12:10 PM (IST)

    पुण्यातील साखर संकुलसमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांचं आंदोलन

    पुण्यातील साखर संकुलसमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांकडून आंदोलन करण्यात येत आहे. साखरेच्या वाढलेल्या दरामुळे प्रति टन ऊसाला 1000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तात्काळ उसाला एफआरपी अधिक 2000 भाव जाहीर करावा अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांचं आंदोलन सुरू आहे.

  • 24 Aug 2026 11:54 AM (IST)

    लातूरमध्ये पावसात खंड, पिके धोक्यात

    लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन शेतीला कोरड्या हवामानाचा मोठा फटका बसतो आहे, पावसाअभावी सोयाबीन पिकांची वाढ खुंटली असून पिकं करपायला सुरुवात झाली आहे. पेरणी नंतर पावसाला मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील बहुतांश पिके धोक्यात आली आहेत.

  • 24 Aug 2026 11:53 AM (IST)

    कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी रिक्षाचालकाला मारहाण

    कांदिवलीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकाने मराठी रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालक मराठी सक्तीच्या विरोधात आंदोलन करत होते, त्याचवेळी ही घटना घडली आहे.

  • 24 Aug 2026 11:30 AM (IST)

    पुण्यामध्ये पीएमपी बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू

    सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेल समोर खानापूर वरून येणाऱ्या खानापूर ते स्वारगेट या पीएमपीएलच्या बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने एक तरुणी पडली. ती पाठीमागून येणाऱ्या स्कूल बस खाली आल्याने या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडेदहा वाजता घडली आहे.

  • 24 Aug 2026 11:20 AM (IST)

    श्रावणी सोमवार निमित्त जळगावच्या रामेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी

    जळगावच्या रामेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली आहे.  तापी, गिरणा आणि अंजनी अशा तीन नद्यांच्या संगमावर अति प्राचीन रामेश्वर मंदिर वसलेले आहे. प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना त्यांनी स्वतः तसेच लक्ष्मणाने दोन शिवलिंग स्थापित केल्याची आख्यायिका आहे.

  • 24 Aug 2026 10:49 AM (IST)

    राहुल गांधींचा ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रम आता नागपुरात

    राहुल गांधींचा ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रम आता नागपुरात होणार आहे. याआधी पुण्यात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुढील कार्यक्रम नागपुरात होणार आहे.

  • 24 Aug 2026 10:45 AM (IST)

    वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचं आंदोलन, संजय राऊतही आंदोलकांच्या भेटीला

    वाहतूक कोंडीवरून पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेनं आंदोलन केलं. भांडुपमधील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पूर्व द्रुत गती मार्गावर मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. या आंदोलनानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला.

  • 24 Aug 2026 10:40 AM (IST)

    कांदिवलीत अमराठी रिक्षा चालकांचा रास्ता रोको

    कांदिवलीत अमराठी रिक्षा चालकांनी रस्ता रोको केला आहे. या अमराठी रिक्षा चालकांनी भाषा सक्तीच्या विरोधात भूमिका घेत रास्ता रोको केला आहे. आम्ही मराठी बोलणार नसल्याची भूमिका या रिक्षा चालकांनी घेतली आहे. या आंदोलनानंतर मनसे विभागीय अध्यक्ष दिनेश साळवी हे रिक्षाचालकांवर संतापले.

  • 24 Aug 2026 10:32 AM (IST)

    ११ वी प्रवेशासाठी अखेरची संधी, अद्याप किती जागा रिक्त?

    ११ वी प्रवेशासाठी अखेरची संधी मिळणार आहे.  आता १० वी फेरी जाहीर करण्यात आली आहे. ही फेरी २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान राबवली जाणार आहे.  ८.९४ लाख जागा अजूनही रिक्त आहेत. राज्यात अकरावीच्या तब्बल ८ लाख ९४ हजार जागा रिकाम्या आहेत. प्रवेश निश्चिती २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असणार आहे.

  • 24 Aug 2026 10:22 AM (IST)

    कांदिवलीत वातावरण पेटलं, मराठी सक्तीविरोधात अमराची रिक्षाचालक रस्त्यावर

    कांदिवलीतील जोड रस्त्यावर ऑटो रिक्षा चालकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी सक्तीच्या विरोधात अमराठी ऑटो रिक्षा चालक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी थेट रस्ता अडवला आहे. रस्ता अडवल्याने रस्त्यावर एकच वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 24 Aug 2026 10:13 AM (IST)

    दुटप्पी कोण, हे स्वत:ला प्रश्न विचारावा; राऊतांचा फडणवीसांना प्रत्युत्तर

    महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली होती. आता त्यांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महिला आरक्षण विधेयकावरून दुटप्पी कोण, हे स्वत:ला प्रश्न विचारावं. भाजपकडून खोटारडेपणा सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

  • 24 Aug 2026 10:03 AM (IST)

    अमरावतीत 36 बाळांना वाचवण्यामध्ये यश, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची माहिती

    अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयांमध्ये तीन नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी  रुग्णालयाची पाहणी केली.  ३ नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि 36 बाळांना वाचवण्यामध्ये यश आलं, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

  • 24 Aug 2026 09:50 AM (IST)

    उदय सामंत घेणारा मनोज जरांगे पाटलांची भेट

    मंत्री उदय सामंत आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील व उदय सामंत त्यांच्यात चर्चा होणार आहे. 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे यांनी दिला आहे उपोषणाच्या इशारा त्या अनुषंगाने सामंत जरांगे यांच्या भेटीला.

  • 24 Aug 2026 09:40 AM (IST)

    कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीविरोधात रिक्षा चालकांची दादागिरी

    कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीविरोधात रिक्षा चालकांची दादागिरी पाहायला मिळाली. मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा रोखून आंदोलन सुरु आहे. लिंक रोडवर 20 मिनिटांपासून वाहतूक जाम असल्याचे चित्र आहे. तसेच प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 24 Aug 2026 09:30 AM (IST)

    साखरेच्या दरवाढीमुळे चहाच्या किमतीत देखील दुप्पटीने वाढ

    साखरेच्या दरवाढीमुळे चहाच्या किमतीत देखील दुप्पटीने वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 5 रुपये हाफ मिळणारी चहा 10 ते 15 रुपयांवर पोहोचला आहे. ग्राहकांनी साखरेचे दर कमी करण्याची सरकारकडे मागणी.

  • 24 Aug 2026 09:20 AM (IST)

    दहिसर चेक नाका येथे ट्रॅफिक पोलीस आणि कार चालकामध्ये वाद

    दहिसर चेक नाका परिसरातून ट्रॅफिक पोलीस आणि कार चालकामधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल आणि कार चालकामध्ये तीव्र वादावादी झाली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दहिसर चेक नाका येथे घडली आहे.

  • 24 Aug 2026 09:10 AM (IST)

    आमगाव शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चिखलाचे साम्राज्य

    गोंदियाच्या आमगाव शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळाले. चिखलामुळे व्यापारी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत. मुख्य बाजारपेठेतील मार्ग तात्काळ बनवून देण्याची प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

  • 24 Aug 2026 08:57 AM (IST)

    नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांची गर्दी कायम

    नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांची गर्दी कायम आहे. समोर नंदी नसलेले एकमेव मंदिरात असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान विधीवत पूजा आणि आरतीनंतर पहाटे 5 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.

  • 24 Aug 2026 08:50 AM (IST)

    पावसाळा सुरू होऊन 2 महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील जिल्ह्यात पाणीटंचाईच सावट कायम

    पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी देखील जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचा सावट अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीला जालना जिल्ह्यातील 16 गावे आणि 23 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून जवळपास 57 हजार नागरिकांची तहान अजूनही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे, दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी देखील खालावली असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्याही सिंचनाचा संकट आता शेतकऱ्यांसमोर उभा राहील, दरम्यान येत्या काळात पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या ही कायम राहील शिवाय शेतीमालांच्या उत्पादनात मोठी घाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 24 Aug 2026 08:40 AM (IST)

    चांदगुडे कुटुंबातील तिघांचा अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी, अस्थिविसर्जन मात्र एकाच ठिकाणी

    चांदगुडे कुटुंबातील तिघांचा अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी, अस्थिविसर्जन मात्र एकाच ठिकाणी करण्यात आले.  मुरलीधर चांदगुडे यांचा अंत्यविधी धनगर पिंपळगाव येथे तर कुणाल चांदगुडे आणि संगीता चांदगुडे यांचा  अंत्यविधी छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला होता. मात्र तिन्ही मृतांचे अस्थी विसर्जन पैठणच्या गोदावरी नदीपात्रात एकत्र करण्यात आले. अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी, मात्र अस्थिविसर्जन एकाच ठिकाणी करण्यात आले.

  • 24 Aug 2026 08:30 AM (IST)

    तुकाराम मुंडेंच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदीच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची बैठक

    तुकाराम मुंडेंच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला व्यापाऱ्यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. १५ दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  राज्यातील खाद्यतेल व्यापारी रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहेत.

  • 24 Aug 2026 08:20 AM (IST)

    हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सिए श्याम कलानी पोलिसांच्या ताब्यात

    आयकर विभागाने भांडाफोड केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सिए श्याम कलानीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मधून श्याम कलानीला ताब्यात घेण्यात आले आहे. श्याम कलानी सह इतर 16 कंपन्यांवर 02 हजार 143 कोटी, 43 लाख रुपयांचा निधी बनावट कागदपत्रे तयार करून परदेशात पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. उदगीर मध्ये सिए श्याम कलानीच्या कार्यालयात चार दिवस चौकशी केल्या नंतर आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात सीए शाम कलानी ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्याम कलानी ला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  • 24 Aug 2026 08:10 AM (IST)

    कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

    कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत.  गोदावरी नदीच्या उगमस्थान अर्थात ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.  गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांचा गिरीश महाजन आढावा घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांकडून  माहिती घेणार आहेत.

  • 24 Aug 2026 08:09 AM (IST)

    अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये आग, शिशुच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा आक्रोश…

    अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभागात 3 शिशु चा आगीत होळपळून मृत्यू झाला आहे. शिशुच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयामधील फायर अलार्म यंत्रणाच कार्यन्वित नसल्याचा आरोप होत आहे.

अमरावतीमध्ये आज पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. 39 लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सरकार साखर आयात करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत सरकार साखर आयात करणार आहे. एवढंच नाही तर, माझगाव मोरया गणपती आगमन मिरवणुकीत तणाव, अंड आणि दगड फेकल्याच्या आरोपावरून कार्यकर्त्यांनी गणपतीच्या मंडपा समोर निदर्शन केले. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Aug 24,2026 7:53 AM

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ