बांगलादेश: इस्कॉन मंदिरात जमावाकडून भाविकाची हत्या, थरारक व्हिडीओ समोर

| Updated on: Oct 17, 2021 | 1:30 PM

बांगलादेशात शुक्रवारी मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बांगलादेशामधील नौखाली जिल्ह्यात 200 लोकांच्या जमावानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला.

बांगलादेश: इस्कॉन मंदिरात जमावाकडून भाविकाची हत्या, थरारक व्हिडीओ समोर
बांग्लादेशात इस्कॉन मंदिरावर हल्ला
Follow us on

ढाका: बांगलादेशात शुक्रवारी मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बांगलादेशमधील नौखाली जिल्ह्यात 200 लोकांच्या जमावानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. इस्कॉन मंदिरावर झालेल्या हल्ल्यात पार्थो दास या व्यक्तीचा जीव गेला आहे. या घटनेत 17 लोक जखमी झाले आहेत. शनिवारी समाजकंटकाच्या गटानं दानियापारा महाश्मशान काली मंदिरात घुसून 6 मूर्तींची तोडफोड केली. शनिवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा हल्ला झाला. त्या मंदिराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती.


200 जणांच्या जमावाचा हल्ला

पार्थ दास यांच्यावर 200 लोकांच्या जमावानं हल्ला करत जीव घेतला. त्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्कॉनच्या एका सदस्यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. मंदिरातील तलावात एक मृतदेह तरंगताना दिसत आहे. इस्कॉन समुदायानं बांग्लादेश सरकारकडे या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नौखालीतील इस्कॉन मंदिर आणि भक्तांवर समुदायानं हल्ला केला होतं. यामुळं मंदिराचं मोठं नुकसान झालं असून आणखी 17 जण गंभीर झालेले आहेत. बांग्लादेश सरकारनं सर्व हिंदू समुदायाला सुरक्षा देण्यासंदर्भात आणि दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी इस्कॉन समुदायानं केली आहे.

शेख हसीनांच्या आश्वासनानंतर हल्ले सुरुच

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देत हिंदू समुदायाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच आहेत. शेख हसीना यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करणाऱ्यांना पकडून कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंदू मंदिरांच्या सुरक्षेसाठी देशभरातील मंदिरांच्या बाहेर अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

22 जिल्ह्यात सुरक्षाबल तैनात

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील 22 जिल्ह्यातील मंदिरांबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यामध्ये चांदपूर, बंदरबन, सिलहट, चटगांव, आणि गाजीपूर जिल्ह्यंचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. बांगलादेश सरकारनं बॉर्डर गार्ड बांग्लादेशच्या जवानांना सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात केलं आहे. बीजीबीच्या ऑपरेशन डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल फैजूर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाच्या आदेशानं बीजीबीचे जवान सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

इतर बातम्या:

पाकिस्तानचे NSA मोईद यूसुफ भारत दौऱ्यावर, अफगाणिस्तानच्या मुद्यावर विचारमंथन, तब्बल 5 वर्षानंतर पाकचा अधिकारी भारतात?

बांग्लादेशात मंदिरांवरील हल्ले सुरुच, इस्कॉनच्या प्रार्थनास्थळावर जमावाकडून हल्ला, एका भक्ताचा मृत्यू

Bangladesh Noakhali District violence mob attack at ISKCON temple and killed Partho Das video viral on social media