AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे NSA मोईद यूसुफ भारत दौऱ्यावर, अफगाणिस्तानच्या मुद्यावर विचारमंथन, तब्बल 5 वर्षानंतर पाकचा अधिकारी भारतात?

भारत पुढील महिन्यात अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीवर एनएसएस स्तराची बैठक आयोजित करणार आहे. या बैठकीसाठी ज्या देशांना बोलावलं जाणार आहे त्यामध्ये रशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

पाकिस्तानचे NSA मोईद यूसुफ भारत दौऱ्यावर, अफगाणिस्तानच्या मुद्यावर विचारमंथन, तब्बल 5 वर्षानंतर पाकचा अधिकारी भारतात?
मोईद यूसुफ
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 11:25 AM
Share

नवी दिल्ली: भारत पुढील महिन्यात अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीवर एनएसएस स्तराची बैठक आयोजित करणार आहे. या बैठकीसाठी ज्या देशांना बोलावलं जाणार आहे त्यामध्ये रशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. या प्रादेशिक परिषदेसाठी चीन, इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनाही आमंत्रित केलं जाण्याची शक्यता आहे. ही बैठक युद्धग्रस्त देशातील सुरक्षा परिस्थिती आणि तालिबानच्या राजवटीत मानवी हक्क अबाधित ठेवणं आणि मानवतावादावर आलेलं संकट हाताळण्यावर आधारित असेल. पाकिस्तानचे एनएसए मोईद युसूफ या परिषदेत सहभागी होतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल.

अजित डोवाल अध्यक्षपद भूषवणार

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयातर्फे आयोजित परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची शक्यता आहे. . मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीला तालिबानला आमंत्रित करण्यात आलेले नाही.

रशियाने 20 ऑक्टोबर रोजी मॉस्को फॉरमॅट चर्चेसाठी तालिबानला आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये भारतही सहभागी होणार आहे. पण भारत सरकार आता दिल्लीत होणाऱ्या परिषदेत तालिबानचा समावेश करण्याबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहे. अफगाणिस्तानातील सर्वसमावेशक सरकारचा अभाव हे यामागील कारण आहे.

पाकिस्तानचे एनएसए भारतात येणार

भारताच्या एनएसएतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या परिषदेत पाकिस्तानचा समावेश असेल. या परिषदेत पाकिस्तान काय भूमिका घेणार आहे आणि पाकिस्तानचे एनएसए मोईद युसूफ या परिषदेत सहभागी होतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल. पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांना लगाम घातला पाहिजे, असे भारताचे मत आहे. मात्र, भारताने पाकिस्तानविरुद्ध काम करण्यास तयार असल्याचे संकेतही दिले आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये एससीओच्या दहशतवादविरोधी प्रशिक्षणासाठी तीन वरिष्ठ अधिकारी पाठवूनही हे दाखवून दिले आहे.

5 वर्षानंतर पाकचा अधिकारी भारत दौऱ्यावर?

पाकिस्तानचे एनएसए मोईद युसुफ भारतात आले, तर बऱ्याच काळानंतर एका उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्याची ही भारत भेट असेल. यापूर्वी, 2016 मध्ये, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीझ हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी अमृतसरला आले होते. भारताने या वर्षी मे महिन्यात अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर परिषद घेण्याचे ठरवले होते आणि युसुफही त्यात सहभागी होणार होते. पण कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परिषद आयोजित करता आली नव्हती.

इतर बातम्या:

नंदुरबार झेडपी पोटनिवडणुकीत भाजपला फटका, आता महाविकास आघाडीत सभापतीपदावरुन रस्सीखेच!

तो हिटलरच, म्हणून एकदाचा संपविला! संशयिताचा जबाब, औरंगाबादच्या डॉ. शिंदे खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार

Pakistan NSA Moeed Yusuf invitees for India own conference on Afghanistan Situation

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.