AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबार झेडपी पोटनिवडणुकीत भाजपला फटका, आता महाविकास आघाडीत सभापतीपदावरुन रस्सीखेच!

येत्या 25 ऑक्टोंबर रोजी उपाध्यक्ष आणि दोन सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यात शिवसेनेला उपाध्यक्ष आणि एक सभापती पद मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून उपाध्यक्ष आणि दोन सभापती पद असतील असं बोललं जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सभापतीपदासाठी दावा करण्यात आला आहे.

नंदुरबार झेडपी पोटनिवडणुकीत भाजपला फटका, आता महाविकास आघाडीत सभापतीपदावरुन रस्सीखेच!
नंदुरबार जिल्हा परिषद
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 11:14 AM
Share

नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सभापतीपदावरुन दावेदारी पाहायला मिळत आहे. नंदुरबारमध्ये भाजपला झटका देत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एका जागेचा फायदा झाला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेतील 11 सदस्य अपात्र ठरले होते. त्यामुळे भाजपला सर्वाधिक 7 जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोटनिवडणूक घेण्यात आली. 5 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर 6 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला. (Nandurbar ZP Mahavikas Aghadi claims and counter-claims from the post of Sabhapati)

या पोटनिवडणुकीत भाजपाला याच्या फटका सहन करावा लागला होता. तर महाविकास आघाडीला त्याच्या फायदा झाला. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेचा फायदा झालाय त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. येत्या 25 ऑक्टोंबर रोजी उपाध्यक्ष आणि दोन सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यात शिवसेनेला उपाध्यक्ष आणि एक सभापती पद मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून उपाध्यक्ष आणि दोन सभापती पद असतील असं बोललं जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सभापतीपदासाठी दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नेमकं सभापतीपद कुणाकडे असेल हे 25 ऑक्टोबरला स्पष्ट होईल. मात्र जिल्हा परिषदेचं नेमकं गणित कसं राहील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल काय?

नंदूरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागा रद्द झाल्या होतं. त्यामध्ये भाजपच्या 7 सदस्यांना फटका बसला होता. नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून 11 पैकी भाजपच्या 11 जागा निवडून येतील असा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपच्या 4जागा निवडून आल्या आहेत तर त्यांनी 3 जागा गमावल्या आहेत.

भाजपला फटका, काँग्रेसनं सत्ता राखली

नंदूरबार जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलेली होती. भाजपा नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. तर, शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा राम रघुंशी यांनी डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांचा कोपर्ली गटात पराभव केला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहिणी गीता गावीत यांचा खापर गटात विजय झाला आहे.

मुलीचा विजय, पुतण्याचा पराभव

भाजपा नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून शिवसेनेकडून विजयी झाले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांचा राम रघुवंशी यांनी पराभव केला.

इतर बातम्या :

महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला, डावपेचही ठरले, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक

शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

Nandurbar ZP Mahavikas Aghadi claims and counter-claims from the post of Sabhapati

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.