AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला, डावपेचही ठरले, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक

नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला, डावपेचही ठरले, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 8:57 AM
Share

नागपूर :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.

नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस भेट

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही आता विविध शहरातील कारभारी-नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविण्याचं ठरवलं आहे. त्याच्याच रणनितीचा एक भाग म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फडणवीस-गडकरींमध्ये बैठक पार पडली. परंतु या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. विचारांनी भिन्न असलेले तिन्ही पक्षात सध्या सत्तेत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या आहेत, निकालही लागलेत. त्यात भाजपने चांगली कामगिरी केलेली असली तरी सर्वोत्तम कामगिरी करणं जमलं नाही. त्यात नागपूर पंचायत समिती. जि.प. निकालात काँग्रेसने खूपच चांगली कामगिरी केलीय. साहजिकच भाजपसमोरची डोकेदुखी वाढलीय.

नागपुरात जि.प, पंचायत समितीमध्ये काँग्रेसची बाजी, भाजपसमोरचं टेन्शन वाढलं!

जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 गणांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे.

महापालिका निवडणुकांची रणनिती

जि.प आणि पंचायत समितीमध्ये अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचं आव्हान भाजपला होतं. आता याच निकालातून धडा घेत भाजप त्या दृष्टीने डावपेच आखत आहे. कोणत्या महापालिकेत काय  परिस्थिती आहे?, भाजपला कुठे अनुकुल वातावरण आहे?, कुठे आणखी जोर लावाला लागू शकतो?, कोणत्या महापालिकेची जबाबदारी कोणत्या नेत्यावर सोपवायची?, अशा अनेक विषयांवर गडकरी-फडमवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा :

एकाच विमानातून प्रवास, गप्पांची मैफल, इम्प्रेस सुजय विखेंकडून पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहीन : मुख्यमंत्री

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.