गड भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पण मुसंडी काँग्रेसची, नागपूर झेडपीला काँग्रेसला दणदणीत यश

माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.

गड भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पण मुसंडी काँग्रेसची, नागपूर झेडपीला काँग्रेसला दणदणीत यश
नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Oct 06, 2021 | 4:43 PM

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर, मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे.

नागपूर जिल्हा परिषद

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी निवडणूक लागली होती. काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 03, राष्ट्रवादीनं 2 आणि 2 इतर उमेदवारांनी जिल्हा परिषदेत विजय मिळवला आहे. नागपूरमधील जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या 31 जागांपैकी भाजपनं 6, राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 जागांवर आणि काँग्रेसनं 21 जागांवर आणि 2 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

Nagpur Pacnhayat Samiti

नागपूर पंचायत समिती

उमरेडवर काँग्रेस झेंडा

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत काँग्रेसला मोठं यश मिळालंय. जिल्हा परिषदेच्या 9 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्त्वात उमरेड विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समिती आणि राजोला
जिल्हा परिषदेवर काँग्रेसने झेंडा रोवला. राजोला जिल्हा परिषदेची जागा गेल्या वेळेस भाजपकडे होती, पण राजीव पारवे यांनी ती जागा आपल्याकडे खेचून आणलीय. राजोला जिल्हा परिषद मतदारसंघात अरुण हटवार विजयी झालेय. त्यासोबतच समितीत सुरेश लेंडे ,माधुरी देशमुख आणि जयश्री कडव विजयी झालेय. त्यामुळे उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसलाय.

अनिल देशमुखांच्या गैरहजेरीचा राष्ट्रवादीला फटका

नागपूर जिल्ह्यातील काटोल या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांकडे केलेलं दुर्लक्ष, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार आणि ते बेपत्ता असल्याने मतदारसंघात विकास कामांकडे करण्यात आलेला दुर्लक्षामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचा मत भाजपचे नेते चरणसिंग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

नागपूरमध्ये सुनील केदार यांनी करुन दाखवलं

नागपूरमधील जिल्हा परिषदेच्या 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी भाजपचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी ताकदीनं उतरले नव्हते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रचाराची कमान सांभाळली तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली. तर, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचाही मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजला होता. मात्र, निवडणूक निकालातून सुनील केदार यांनी विरोधकांना त्यांची ताकद दाखवून दिली आहे.

इतर बातम्या:

ZP Election Results 2021: नागपूर ते नंदूरबार काँग्रेसची सरशी, पालघरमध्ये सेनेचा झेंडा; धुळ्यात कमळ, अकोल्यात वंचितला कौल, वाशिममध्ये घड्याळाची टिक-टिक.

स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?

Maharashtra ZP Panchayat Samiti Election 2021 result live update Congress get number in Nagpur ZP and PS Result

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें