US-Iran Peace Talk : मध्यस्थीच्या चर्चेआधीच पाकिस्तानचा दारुण पराभव, इस्रायलने शरीफ सरकारला झुकवलं, नेतन्याहू जे बोलले ते करुन दाखवलं
US-Iran Peace Talk : इस्लामाबादमध्ये आजपासून इराण आणि अमेरिकेत शांतता चर्चेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच मध्यस्थाच्या भूमिकेत असलेल्या पाकिस्तानचा नैतिक दारुण पराभव झाला आहे. पाकिस्तानकडे प्रतिमा उंचावण्याची संधी होती. पण त्यांनी माती केली.

अमेरिका-इराण युद्धविरामानंतर पाकिस्तानला मध्यस्थीचा मान मिळाला. खरंतर पाकिस्तानला जगात आपली प्रतिमा उंचावण्याची चांगली संधी मिळाली आहे. पण या उलट घडतय. मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या विश्वासहर्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत चाललय. कारण सीजफायरची घोषणा झाली त्या दिवसापासून लेबनॉनवरुन वाद सुरु आहे. लेबनॉन या युद्धविरामाचा भाग नाही असं इस्रायल, अमेरिका दोघांचं म्हणणं आहे. तेच इराण म्हणतो की लेबनॉन या सीजफायरचा भाग आहे. म्हणूनच आम्ही सीजफायरसाठी तयार झालो असं इराणचं म्हणणं आहे.
इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरुच आहेत. जो पर्यंत इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरु राहतील तो पर्यंत आम्ही हॉमुर्ज स्ट्रेट उघडणार नाही असं इराणने सांगितलय. त्याशिवाय हॉर्मुजमध्ये इराणकडून बेकायद टोल वसुली सुरु आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून कुठल्याही अटी, परवानगीशिवाय जलवाहतूक सुरु राहिलं या अटीवर सीजफायर झालय. त्यामुळे पाकिस्तानने कशाच्या आधारावर हा सीजफायर घडवून आणला असा अनेक एक्सपर्ट प्रश्न विचारत आहेत.
मध्यस्थ म्हणून त्यांचा हा नैतिक पराभव
त्यात आता आजपासून इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराणमध्ये शांतता वाटाघाटीला सुरुवात होण्याआधीच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी नको ते वक्तव्य केलं. इस्रायलला त्यांनी कॅन्सर म्हटलं. त्यावरुन इस्रायलमध्ये मोठा गहजब झाला. हे थेट आमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे, अशी भाषा आम्ही अजिबात मान्य करणार नाही असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानला झुकावं लागलं. पाकिस्तानचे सरंक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आपल्या एक्स हँडलवरुन इस्रायल विरोधी पोस्ट डिलिट कराव्या लागल्या. एकप्रकारे ही पाकिस्तानने चूक मान्य करण्यासारखं आहे. मध्यस्थ म्हणून त्यांचा हा नैतिक पराभव आहे.
The Prime Minister’s Office:
Pakistan Defence Minister’s call for Israel’s annihilation is outrageous. This is not a statement that can be tolerated from any government, especially not from one that claims to be a neutral arbiter for peace.
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) April 9, 2026
नको त्या वेळी, नको ते बोलून पाकिस्तानला अडचणीत आणलं
पाकिस्तानचे सरंक्षण मंत्री ख्वाजा आसिफ नेहमीच अशा प्रकारे बरळत असतात. त्यांची बोलण्याची वेळ चुकली आहे. त्यांनी अशावेळी इस्रायलबद्दल स्टेटमेंट केलय त्यामुळे पाकिस्तानच्या इमेजला धक्का बसला आहे. कारण पाकिस्तान मध्यस्थ आहे. तो निष्पक्ष नाहीय हे यातून दिसून येतेय. महत्वाचं म्हणजे ज्या तीन देशात युद्ध चाललय त्यात इस्रायल सुद्धा आहे. म्हणून ख्वाजा आसिफ यांनी नको त्या वेळी, नको ते बोलून पाकिस्तानला अडचणीत आणलय.