AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील राहण्यायोग्य चांगल्या शहरांची यादी समोर, मुंबई-दिल्ली कितव्या क्रमाकांवर? पहिला नंबर कोणाचा?

जगातील राहण्यायोग्य चांगल्या शहरांची यादी समोर आली आहे. या यादीतील पहिल्या 100 क्रमांकात भारतीय शहरांचा समावेश नाही.

जगातील राहण्यायोग्य चांगल्या शहरांची यादी समोर, मुंबई-दिल्ली कितव्या क्रमाकांवर? पहिला नंबर कोणाचा?
| Updated on: Jul 11, 2026 | 7:07 AM
Share

जगातील राहण्यायोग्य चांगल्या शहरांची यादी समोर आली आहे. या आठवड्यात ‘द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ ने ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026’ रिपोर्ट जारी केला आहे. या यादीत एकूण 173 शहरांची नावे आहेत. शहरातील विविध सुविधा आणि राहणीमानाचे मापदंड लावून ही यादी तयार करण्यात आलेली आहेत. भारतातील दिल्लीने या यादीत 120 वा क्रमांक मिळवला आहे. तर डेन्मार्कचे कोपेनहेगन शहर हे जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला मागे टाकत कोपेनहेगनने पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. ही यादी तयार करताना शहरातील शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, संस्कृतीचाही विचार करण्यात आला आहे.

भारतीय शहारांचा देखील यादीत समावेश आहे. भारतातील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू या शहरांचा या यादीत समावेश आहे.

नवी दिल्ली : 120 मुंबई : 121 चेन्नई : 123 बंगळुरू : 127

यंदा भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईच्या क्रमवारीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. रिपोर्टनुसार, कोपेनहेगन शहरात स्थिरता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत. तसेच शहरातील संस्कृती, पर्यावरण, सार्वजनिक सेवा चांगल्या असल्याने शहराने अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. टॉप दहा शहरात अमेरिकेच्या फक्त एकाच शहराने स्थान मिळवलं आहे. कॅनडाचे वँकूवर शहराने 9 वा क्रमांक पटकावला आहे. अमेकिरेचे न्यूयॉर्क शहर हे तिसऱ्या क्रमांकावरून थेट 66 व्या क्रमाकांवर पोहोचले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि दहशतवादी घटनांमुळे क्रमवारीत घसरण होते. तर होनोलुलु शहर हे जागतिक क्रमवारीत 2 अंकानी घसरल्यानंतरही अमेरिकीतील राहिण्यायोग्य शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकांचं शहर ठरलं आहे.

खरंतर पश्चिम युरोपमध्ये जगातील सर्वात राहण्यायोग्य प्रदेश राहिला आहे. दुसरीकडे आशियातील शहरांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 2025 च्या तुलनेत दहा चिनी शहरांनी क्रमवारीत सुधारणा केली आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धामुळे यादीवर परिणाम झाल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धामुळे व्यापाऱ्यावर परिणाम झाल्याने काही देशांची क्रमवारीत घसरण झाली, असेही यादीत नमूद करण्यात आलंय.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ