श्रीलंकेचा अमेरिकेला डबल झटका, घेतला मोठा निर्णय, ट्रम्प यांची लायकीच काढली

Donald Trump : श्रीलंकेने अमेरिकेला आणखी एक मोठा दणका दिला आहे. इराणवरील हल्ला टाळण्यासाठी श्रीलंकेने मोठे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

श्रीलंकेचा अमेरिकेला डबल झटका, घेतला मोठा निर्णय, ट्रम्प यांची लायकीच काढली
SL vs USA
Image Credit source: Google
| Updated on: Mar 20, 2026 | 9:11 PM

अमेरिका आणि इराणच्या युद्धात अनेक देशांनी पाठ फिरवलेली असताना इराणला श्रीलंकेने मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी इराणच्या जहाजावर अमेरिकन पाणबुडीने हल्ला केला होता. त्यानेळी श्रीलंकेने इराणच्या खलाशांचे मृतदेह बाहेर काढून ते मायदेशी काढण्यास मदत केली होती. त्यानंतर आता श्रीलंकेने अमेरिकेला आणखी एक मोठा दणका दिला आहे. इराणवरील हल्ला टाळण्यासाठी श्रीलंकेने मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

श्रीलंकेने अमेरिकन विमानांना प्रवेश नाकारला

श्रीलंकेने अमेरिकन लढाऊ विमानांना प्रवेश नाकारला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांनी संसदेत सांगितले की, ‘आम्ही 2 अमेरिकन लढाऊ विमानांना आपल्या देशात उतरू दिले नाही. अमेरिकेने यासाठी वारंवार विनंती केली होती, पण आम्ही स्पष्टपणे नकार दिला. जर या दोन्ही लढाऊ विमानांना श्रीलंकेत तळ मिळाला असता, तर अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला होऊ शकला असता. आम्ही युद्धाचे समर्थक नाही. आम्ही श्रीलंकेला या युद्धात ओढू देणार नाही. आमच्यासाठी अमेरिका आणि इराण दोन्ही समान आहेत. जर आम्ही युद्धात इराणची मदत करत नाही, तर अमेरिकेची का करू?’

याआधी तुर्की आणि स्पेनचाही अमेरिकेला दणका

श्रीलंकेच्या स्थानिक माध्यमांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अमेरिकेने श्रीलंकेच्या दक्षिण-पूर्वेकडील मत्ताला आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन लढाऊ विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती, जी दिशानायके सरकारने नाकारली. त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन लढाऊ विमानांना प्रवेश नाकारणारा श्रीलंका हा पहिला देश नाही. यापूर्वी तुर्की आणि स्पेन यांनीही अमेरिकेला आपले तळ वापरू दिले नव्हते.

श्रीलंकेने इराणची केली होती मदत

अमेरिकेने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ काही दिवसांपूर्वी इराणच्या डेना युद्धनौकेला पाण्यात बुडवले होते, तेव्हा श्रीलंकेने मोठी मदत केली. श्रीलंकेने प्रथम बचाव मोहीम राबवली. या युद्धनौकेतील मृत खलाशांचे मृतदेह इराणला पाठवले होते. तसेच जखमींवर योग्य उपचार करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. त्यानंतर आता इराणवर होणारा मोठा हल्ला श्रीलंकेमुळे झाला नाही.

Follow Us