AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran war : ‘आधी युद्ध थांबवा,तरच…,’ इराण युद्धादरम्यान जवळच्या मित्राने सोडली अमेरिकेची साथ

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ले सुरु केल्यानंतर आज २१ दिवस झाले तरी ही युद्ध थांबलेले नाही. होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केली असल्याने जगात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अशात अमेरिकेच्या आणखी एका मित्राने त्यांची साथ सोडली आहे.

Iran war : 'आधी युद्ध थांबवा,तरच...,' इराण युद्धादरम्यान जवळच्या मित्राने सोडली अमेरिकेची साथ
donald trump
| Updated on: Mar 20, 2026 | 8:24 PM
Share

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर जगात इंधनाची टंचाई सुरु झाली आहे. या युद्धाला आज २१ दिवस पूर्ण होत आहेत. या युद्धात अमेरिकेवर अनेक राष्ट्रांनी टीका केली आहे, अमेरिकेतूनही या युद्धाला विरोध आहे. मात्र आता अमेरिकेचा जवळचा सहकारी असलेल्या एका देशाने आता त्याची साथ सोडली आहे. युरोपियन देश स्वित्झर्लंडने म्हटले आहे जर अमेरिका इराणवरील हल्ले थांबवणार नसेल तर अमेरिकेला शस्रास्रे निर्यात करण्यासाठी कंपन्यांना तो लायसन्स देणार नाही.

रॉयटर वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार स्वित्झर्लंडने म्हटले आहे की तो कोणत्याही प्रकारे युद्धाला प्रोत्साहन देणार नाही आणि तटस्थ आहे. त्यामुळे अमेरिकेला शस्रास्रांची निर्यात जारी करणार नाही.

स्वित्झर्लंड सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की इराणसोबत सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षात सामील देशांना युद्ध सामग्री निर्यातीची परवानगी संघर्ष सुरु असेपर्यंत दिला जाणार नाही. सध्या अमेरिकेला युद्ध सामुग्रीच्या निर्यातीची अनुमती दिली जाणार नाही.

अमेरिका आणि इस्राईल यांनी इराणवर हल्ले केल्यानंतर जागतिक तेल पुरवठ्याचा महत्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ स्ट्रेटला बंद केले आहे. या होर्मुज स्ट्रेटला बंद केल्यानंतर जगातील तेल पुरवठा बाधित झाला आहे. कारण मध्य-पूर्वेतील देश होर्मुझद्वारे त्यांचे तेल विकतात.  होर्मुज स्ट्रेट बंद झाल्याने इंधनात टंचाई झाली आहे. तेल आणि गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. होर्मुझद्वारे जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होत असते.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या युरोपियन सहकाऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. मात्र, त्यांच्या मदतीला कोणत्याही देशाने होकार दिलेला नाही.

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि जपान या देशांनी अलिकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरु करण्यासाठी काही योजना असेल तर आपण मदत करायला तयार आहोत असे म्हटले होते. मात्र, जर्मनी आणि नेदरलँड यांनी नंतर साफ मनाई करत या मोहिमेचा भाग होण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांनी म्हटले की जोपर्यंत युद्धविराम होत नाही. किंवा किमान संघर्ष थांबत नाही तोपर्यंत ट्रम्प यांच्या योजनेत सहभागी होणार नाही असे त्यांनी निष्क्षून सांगितले होते.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार