AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२० वर्षात अमेरिका पहिल्यांदाच उचलणार हे पाऊल, इराण युद्धात ट्रम्प बाहेर काढणार तुरुपचा एक्का ?

इराणचे युद्ध पुढच्या आठवड्यात धक्कादायक वळणावर पोहचू शकते अशा हालचाली सुरु झाल्या आहेत. या युद्धात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता तुरुपचा एक्का वापरणार आहेत.

२० वर्षात अमेरिका पहिल्यांदाच उचलणार हे पाऊल, इराण युद्धात ट्रम्प बाहेर काढणार तुरुपचा एक्का ?
Trump AND Netanyahu
| Updated on: Mar 20, 2026 | 6:25 PM
Share

गेल्या तीन आठवड्यापासून जगभरातील सर्वांची नजर याच गोष्टीवर आहे की अमेरिका या इराणशी लढण्यासाठी त्यांचे सैन्य पाठवणार का ? मात्र, ट्रम्प यांना या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला आहे. मात्र, ताज्या सॅटेलाईट फोटोने खळबळ उडाली आहे. कारण अशी बातमी आहे की अमेरिका २,२०० घातक मरीन कमांडोंनी भरलेली नवीन युद्धनौका यूएसएस त्रिपोली मध्य पूर्वेकडे पाठवली आहे. विशेष म्हणजे ही युद्धनौका दक्षिण हिंद महासागरात भारताच्या जवळ पोहचली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात इराण युद्ध नव्या आणि खतरनाक वळणावर पोहचू शकते असे म्हटले जात आहे.

गुरुवारी जेव्हा मीडियाने ट्रम्प यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी आपल्या अंदाजात म्हटले की मी कुठेही सैन्य पाठवत नाहीए, आणि जर पाठवले असले तरी कोणाला सांगत नाही. मात्र, ट्रम्प यांचे हे वक्तव्य किती खरे आणि खोटे हा येणारा काळच सांगेल. कारण ट्रम्प हे धक्कातंत्राबाबत प्रसिद्ध आहेत.अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प इराणमध्ये त्यांची मोहिम मजबूत करण्यासाठी हजारो सैनिकांच्या तैनातीवर गंभीरपणे नक्कीच विचार करत आहेत.

मात्र, ट्रम्प यांच्यावर ही वेळ का आली. यासाठी दोन कारणे सांगितली जात आहेत. एक कारण म्हणजे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ला पुन्हा उघडणे. कारण जगातील २० टक्के तेल आणि गॅस याच मार्गाने जाते. २८ फेब्रुवारीपासून या मार्गाला इराणने जवळपास बंद केल्याने जगभरात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इराणने भारत आणि पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या काही टँकरना मोकळा रस्ता दिला आहे. मात्र, पश्चिम देशाच्या जहाजांना हल्ल्याची धमकी दिली आहे. तसेच येथून जाणाऱ्या जहाजांकडून टॅक्स देखील वसुल केला जात आहे. एका टँकर ऑपरेटरने असा दावा केला आहे की त्याला सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सुमारे २० लाख डॉलर द्यावे लागले.

युएसएस त्रिपोली बनणार ट्रम्पचे मोठे हत्यार ?

ट्रम्प यांनी होर्मुझ खुले करण्यासाठी अनेक देशांच्या नौदलाला आवाहन करत नौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता पर्यंत कोणत्याही देशाचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यात आता युएसएस त्रिपोली युद्धनौकाल ट्रम्पसाठी तुरुपचा एक्का साबित होऊ शकते. जाणकारांचे म्हणणे आहे की ट्रम्प यांना तेलाचा हा मार्ग सुरक्षित करायचा असेल तर त्यांना इराणच्या किनाऱ्यावर सैनिक उतरवावे लागणारच आहेत. इराणच्या नौदलाचा मोठा भाग अमेरिकेने आधीच नष्ट केल्याने ट्रम्पसाठी हे आव्हान फार मोठे नसणार असे म्हटले जात आहे. ट्रम्प या मरीन सैनिकांचा वापर छोट्या बेटांवर कब्जा करण्यासाठी करु शकतो. म्हणजे कमर्शियल जहाजांना सुरक्षित बाहेर काढता येऊ शकेल.

दुसरे मोठे कारण

दुसरे मोठे कारण म्हणजे इराणचा आण्विक खजाना नष्ट करणे. इराणकडे सुमारे ९५० पाऊंडहून जास्त उच्च संवर्धित युरेनियम आहे. ज्याचा वापर करुन अणू बॉम्ब बनवता येऊ शकतो. हे युरेनियम त्याठीकाणी ढीगाऱ्याखाली असावे ज्यावर इस्राईल आणि अमेरिकेने बॉम्ब वर्षाव केला होता. या साठ्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जमीनी सैनिक कारवाईची गरज लागणार आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते कधीच इराणला अणू बॉम्ब बनवू देणार नाहीत. मग भले त्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला लागो.

तर २० वर्षांत पहिल्यांदा असे घडेल

या युएसएस त्रिपोली युद्ध नौकेवर जपानच्या ओकिनावा स्थित ३१ व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटचे २,२०० सैनिक सवार आहेत. हे सैनिक जमीन आणि हवाई युद्ध, इतर अन्य जागी लढण्यात माहिर आहेत. युएसएस त्रिपोली युद्ध नौकेवर एफ -३५ स्टील्थ लढाऊ जेट आणि घातक हेलिकॉप्टर तैनात आहे. जर ट्रम्प पुढच्या आठवड्यात या सैनिकांना उतरवण्याचा निर्णय घेत असतील तर २० वर्षांत पहिल्यांदा असे घडेल की जेव्हा अमेरिकन सैनिक कोणा मोठ्या युद्ध क्षेत्रात जमीनीवर लढेल.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक