इराणचा भीषण हल्ला, अमेरिकन सैन्याने गुडघे टेकवले, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सर्वात मोठा झटका, जगभरात मोठी खळबळ

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. अमेरिकेकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे, मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे, ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.

इराणचा भीषण हल्ला, अमेरिकन सैन्याने गुडघे टेकवले, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सर्वात मोठा झटका, जगभरात मोठी खळबळ
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 4:21 PM

गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इरामध्ये युद्ध सुरूच आहे. मध्यंतरी अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा करताच अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे युद्ध चांगलंच पेटलं. अमेरिकेकडून सातत्याने इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष बनवण्यात येत आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेचे सैन्य तळ मध्य पूर्वेमध्ये ज्या -ज्या देशांमध्ये आहेत, त्या -त्या देशांवर हल्ले सुरू आहेत.

अमेरिकेनं इराणविरोधातील आपली युद्ध मोहीम आता अधिक तीव्र केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर थेट असा दावा केला आहे, की, आम्ही आता लवकरच इराणचा पराभव करू, एकदा का इराणचा पराभव झाला की, आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूज आमच्या ताब्यात घेऊन आणि त्याला अधिकृतरित्या अमेरिकेचा भाग म्हणून घोषीत करू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं, आहे जेव्हा स्ट्रेट ऑफ होर्मूज पूर्णपणे ठप्प आहे, या मार्गाने होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मात्र हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणकडून अमेरिकेच्या सैन्यांवर भीषण हल्ला करण्यात आला आहे. इराणने केलेल्या दाव्यानुसार स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अमेरिकेच्या सैन्य जहाजांवर इराणकडून भीषण हल्ला करण्यात आला असून, अमेरिकेच्या सैन्याने गुडघे टेकावले आहेत. हा स्ट्रेट ऑफ होर्मूज ताब्यात घेण्याचं स्वप्न पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एवढंच नाही तर इराणकडून मध्य पूर्वेत जिथे -जिथे अमेरिकन सैन्यतळं आहेत, तिथे-तिथे हल्ले सुरूच आहेत. जर अमेरिकेनं आमच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केलं तर आम्ही मध्य पूर्वेतील सर्व ऊर्जा केलं उद्ध्वस्त करू अशी धमकी देखील काही दिवसांपूर्वी इराणकडून अमेरिकेला देण्यात आली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us