मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, ज्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता ते घडलं, अमेरिकेत हाहाकार

अनेक देशांवर प्रचंड टॅरिफ लावून जगात एक नवं व्यापारी युद्ध सुरू करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतून मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, ज्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता ते घडलं, अमेरिकेत हाहाकार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2025 | 5:03 PM

फ्रान्सनंतर आता अमेरिकेमध्ये सर्वात मोठं आंदोलन होणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी अमेरिकेतली जनता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 2500 ठिकाणी एकाचवेळी हे आंदोलन होणार आहे. लाखो लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. No Kings, कोणीच राजा नाही असं या आंदोलनाचं नाव आहे.

विशेष म्हणजे याच नावाचं एक आंदोलन चार महिन्यांपूर्वी देखील ट्रम्प यांच्या विरोधात करण्यात आलं होतं. त्यावेळी अमेरिकेच्या छोट्या-मोठ्या शहरातील जवळपास तब्बल पाच लाख लोक ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या विशेष अधिकारांचा विरोध करण्यात आला होता.

हे आंदोलन का होत आहे?

नो किंग्स नावानं हे आंदोलन होणार आहे, याचाच अर्थ असा की अमेरिकेत कोणीच राजा नाही. डोनाल्ड ट्रम्प हे लोकशाहीला झुगारून आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा या आंदोलकांचा आरोप आहे. ते न्यायालयाच्या आदेशांकडे देखील दुर्लक्ष करतात.विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे. एवढंच नाही तर ट्रम्प यांनी मीडियावर देखील अघोषीत आणीबाणी लागू केली आहे, असा या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांच्याकडून सुरू असलेल्या हुकूमशाही विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, अशी माहिती अमेरिकेमधील विविध संघटनांकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेत शटडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे तीथे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही जणांना सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे, सध्या अमेरिकेत प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे हा असंतोष आता आंदोलनातून बाहेर पडणार आहे, 18 ऑक्टोबरला होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं विविध संघटना आणि नागरिक सहभागी होणार आहे, हा आकडा जवळपास बारा लाखांच्या आसापास असू शकतो असा अंदाज आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, एकीकडे जगात टॅरिफ वॉर सुरू असतानाच आता अमेरिकेत अंतर्गत घडामोडींनी देखील वेग घेतला आहे.