
शनिवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर भयंकर स्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने केलेल्या घातक हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने जोरदार उत्तर दिले. तब्बल 25 पाकिस्तानी लष्कराच्या चाैक्या अफगाणिस्तानने ताब्यात घेतल्या. या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला पळता भुई कमी झाल्याचे काही व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. यासोबतच अफगाणिस्तानने 7 पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडले. अफगाण सैन्याने पाकिस्तानात घुसून सात वेगवेगळ्या भागात जड शस्त्रास्त्रांचा मारा केला. या हल्ल्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानवर मोठा हल्ला चढवला. जगातील मुस्लिम देशांनी चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना तात्काळ युद्ध थांबवण्यास सांगितले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील तणावानंतर थेट भारताला ओढण्यात आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने कोणत्याही स्थितीमध्ये अफगाणिस्तानसोबतचा संघर्ष थांबवणे आवश्यक आहे. कारण याचा फायदा थेट भारत उठवून शकतो. पाकिस्तानमधील सर्वात मोठे वृत्तपत्र डॉनमधील संपादकीय पानावर याबद्दल लिहिण्यात आलंय.
डॉनमध्ये लिहिण्यात आले की, पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत युद्ध थांबवले पाहिजे. जर हे युद्ध सुरू राहिले तर त्याचा थेट फायदा भारताला होईल. तालिबान आणि भारताचे चांगले संबंध नव्हते. मात्र, मागील काही दिवसांपासून यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत. अफगाणिस्तानचे विदेश मंत्री आमिर खान मुत्तकी भारत दाैऱ्यावर होते. पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत संघर्ष सुरू ठेवला तर ते घातक आहे.
हेच नाही तर पाकिस्तानचे मित्र देश सऊदी अरेबिया आणि इराणनेही हे युद्ध थांबवण्यास सांगितले. अफगाणिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना पाकिस्तानने उत्तर नक्कीच द्यायला हवे. मात्र, युद्ध लढले नाही पाहिजे. कारण हे युद्ध जास्त काळ चालले आणि जगाला चुकीचा संदेश देखील जाईल, अशी मोठी भीती पाकिस्तानच्या माध्यमांनी वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेला काही महिने होत नाहीत तोवरच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती आहे.