Pakistan Viral News : माजी पंतप्रधानांवरच बलात्कार? पाकिस्तानमध्ये चालले काय? व्हायरल मेडिकल रिपोर्टचे सत्य तरी काय?

Pakistan former PM Sexual Assault : पाकिस्तानमध्ये चाललंय काय? असा सवाल विचारण्यात येत आहे. माजी पंतप्रधानावर तुरुंगातच बलात्कार करण्यात आल्याचा दावा समाज माध्यमांवर व्हायरल वृत्त आणि मेडिकल रिपोर्ट आधारे करण्यात आला आहे.

Pakistan Viral News : माजी पंतप्रधानांवरच बलात्कार? पाकिस्तानमध्ये चालले काय? व्हायरल मेडिकल रिपोर्टचे सत्य तरी काय?
पाकिस्तानमध्ये चाललंय काय?
Image Credit source: गुगल
| Updated on: May 03, 2025 | 1:49 PM

पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. त्याच दरम्यान समाज माध्यमांवर पाकिस्तानमधील एक धक्कादायक बातमी व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानावर तुरूंगात लष्करी अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा दावा करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल वृत्त आणि मेडिकल रिपोर्ट आधारे हा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानची न्यूज साईट डॉन च्या एका वृत्ताचा त्यासाठी आधार घेण्यात येत आहे. तर काही सोशल मीडिया हँडलवरून यासंबंधीचे वैद्यकीय अहवाल शेअर करण्यात येत आहेत. ही बातमी माध्यमांवर व्हायरल होत आहे. बातमीला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. टीव्ही९ सुद्धा या बातमीची पुष्टी करत नाही.

एक्सवरील तो दावा काय?

समाज माध्यमांवर केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर लष्करी अधिकाऱ्याने तुरुंगात बलात्कार केला आहे. एका X हँडलवर याविषयी लिहिले आहे की, “इमरान खान यांच्यावर पाकिस्तानी लष्करातील मेजरने बलात्कार केला आहे. पाकिस्तानी तुरूंगात कैद्यांसोबत अनैसर्गिक अत्याचार ही सामान्य बाब आहे. त्या व्यक्तीचा अभिमान आणि त्याची इज्जत कमी करण्यासाठी, त्याला मेल्याहून मेले वाटण्यासाठी असे केले जाते.”

अर्थात या दाव्याची अधिकृत माहिती अथवा दुजोरा कुठेही देण्यात आलेला नाही. समाज माध्यमांवर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉनमधील ज्या वृत्ताचा दाखला देण्यात येत आहे, त्याची पण कोणी खातरजमा केल्याचे दिसून येत नाही. हा बदनामीचा प्रयत्न पण असू शकतो. लष्कराचे आणि इम्रान खान यांचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे पुढे त्यांच्यावर विविध खटले चालवत त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहेत.

कुटुंबिय चितेंत

मीडियातील वृत्तानुसार, मार्च महिन्यात माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली होती. पाकिस्तानी वैद्यकीय तज्ज्ञांच्या एका पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती. अदियाला तुरुंगात ही तपासणी करण्यात आली होती. डॉनच्या वृत्तानुसार, अर्धा तास त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात आले. पण हा अहवाल लागलीच जाहीर करण्यात आला नाही.

इमरान खान यांच्या पीटीआय या पक्षाच्या नेत्याने सरकारवर अनेक आरोप केले आहेत. त्यानुसार, इमरान खान यांच्या बहिणी अथवा इतर नातेवाईकांना त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी सुद्धा काहीच माहिती देण्यात येत नसल्याने कुटुंबिय चिंता व्यक्त करत आहेत.