AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hafiz Saeed Location : शहर, गल्ली आणि घर क्रमांक… भामटा हाफिज सईद उर्फ TATA JI चा हा पूर्ण पत्ता

Hafiz Saeed Residence in Pakistan : हाफिज सईद याला अमेरिकेने त्यांच्या SDN यादीत सहभागी केले आहे. दहशतवादी, ड्रग्ज माफिया यांच्यासाठी ही यादी आहे. भारताविरोधात गरळ ओकणारा हाफिज सध्या याठिकाणी दडून बसला आहे.

Hafiz Saeed Location : शहर, गल्ली आणि घर क्रमांक... भामटा हाफिज सईद उर्फ TATA JI चा हा पूर्ण पत्ता
दहशतवादी हाफिज सईदImage Credit source: गुगल
| Updated on: May 03, 2025 | 9:39 AM
Share

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि भारतात अनेक दहशतवादी हल्ला करण्याचा सूत्रधार, लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या हाफिज सईद सध्या भारताच्या टार्गेटवर आहे. धास्तावलेला हाफिज सध्या लष्कराच्या पदराखाली दडून बसला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला करण्यात आला. त्यात हाफिज आणि लष्कराचा हात असल्याचे उघड झाले आहे. दे रेजिडेंस फ्रंट ग्रुपने अगोदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. नंतर घुमजाव केले. हाफिजने या हल्ल्यापूर्वी अनेकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याशी संबंधित कोणालाच सोडणार नसल्याचे ठणकावले आहे.

हाफिज सईदचा पूर्ण पत्ता

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाचे परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाच्या (OFAC) संकेतस्थळावर हाफिज सईदसंबंधीची माहिती देण्यात आली आहे. त्यात हाफिज हा पाकिस्तानातील कोणत्या शहरात, कोणत्या परिसरात, कोणत्या गल्लीत राहतो याची माहिती देण्यात आली आहे.

हाफिज हा सध्या पंजाब राज्यातील लाहोर या शहरात राहतो. तो जौहर मोहल्ला परिसरात त्याचा बंगला आहे. जौहर मोहल्ला -116E हा त्याचा घर क्रमांक आहे. त्याचा राष्ट्रीय ओळखपत्र क्रमांक – 3520025509842-7 असा आहे. हाफिज सईद याचे पूर्ण नाव सैय्यद हाफिज सईद असे आहे. त्याचे कोड नेम ‘TATA Ji’ असे आहे.

दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज

हाफिज सईद हा अमेरिकेने तयार केलेल्या दहशतवादी आणि ड्रग्ज माफियांच्या यादीत, SDN मध्ये आहे. तो सर्वात धोकादायक आणि विश्वासघातकी म्हणून ओळखल्या जातो. एसडीएन यादीत समाविष्ट दहशतवादी, व्यक्ती यांच्या अमेरिकेतील संपत्ती जप्त करण्यात येते. त्यांच्याशी अमेरिकन नागरिक, व्यापारी, व्यावसायिक कोणताही व्यवहार ठेवू शकत नाहीत. तर जो देश या व्यक्तींना आश्रय देतो, त्यांच्या काही आर्थिक नाड्या अमेरिका आवळतो.

1 कोटी डॉलरचे बक्षिस

हाफिज सईद हा अमेरिकेच्या SDN यादीत आहे. त्याच्यावर सध्या 1 कोटी डॉलरचे बक्षिस आहे. त्याचे कुटुंबिय सध्या लाहोर शहरातील या घरात राहत आहेत. तर भारत हल्ल्या करण्याच्या भीतीने हाफिज टरकला आहे. त्याला लष्करी छावणीत लपवल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानात गनमॅनची दहशत आहे. भारतविरोधातील अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. हाफिज दोनदा या हल्ल्यातून वाचला आहे. त्यामुळे आता त्याने लष्कराचा पदर डोक्यावर घेतला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.