प्रचंड मोठे बंड, पाकिस्तानची झोपच उडाली; थेट सरकारला आव्हान दिल्याने अचानक मोठं संकट!

पाकिस्तानी शासनाची क्रूरता तसेच 600 पेक्षा जास्त सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केल्याने तेथील लोकांमध्ये तीव्र स्वरुपाचा संताप आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात उद्रेक निर्माण झाला आहे.

प्रचंड मोठे बंड, पाकिस्तानची झोपच उडाली; थेट सरकारला आव्हान दिल्याने अचानक मोठं संकट!
pakistan pok protest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2026 | 7:16 PM

POK People Protest : पाकिस्तानात महागाई, गरिबी, भूकबळी या समस्या खूप जुन्या आहेत. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अद्याप त्यांना यातून यश आलेले नाही. आर्थिक पातळीवर डबघाईला आलेला असताना पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापत्या काही कमी होत नाहीत. पाकिस्तानात पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा भारतालाही फटका बसत आलेला आहे. परंतु आता मात्र पाकिस्तानपुढे मोठं संकट उभे राहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून पाकिस्तानला मोठ्या बंडाचा सामना करावा लागत आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय घडतंय?

सध्या पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेथील लोकांवर पाकिस्तानी सरकारकडून अन्याय-अत्याचार केले जातात. म्हणूनच पाकिस्तानी सरकारच्या विरोधात त्या भागात असंतोष आहे. पाकिस्तानी शासनाची क्रूरता तसेच 600 पेक्षा जास्त सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केल्याने तेथील लोकांमध्ये तीव्र स्वरुपाचा संताप आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात उद्रेक निर्माण झाला आहे. या आंदोलनाचा शौकत नवाज मीर हे प्रमुख चेहरा आहेत. त्यांना पाकिस्तानी सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. त्यानंतर आता जॉइंट आवामी अॅक्शन कमिटीने (JAAC) आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या संघटनेने पाकिस्तानी सरकारलाच आव्हान दिले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विशेष म्हणजे या आंदोलनातील काही नेत्यांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. या आंदोलनाचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत JAAC चे सदस्य सरदार अमन खान हो बोलताना दिसत आहेत. पाकिस्तानी सरकारकडून केला जाणारा अन्याय, राशन, पीठ यांची टंचाई यांचा उल्लेख करत अमन खान हे काश्मिरी लोकांना आवाहन करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, याच व्हिडीओमध्ये पुंछ, मेंढर, राजौरी, जम्मू, लडाख, कारगील, बाल्टिस्तान या भागातील लोकांनी एकजुट होऊन पाकिस्तानी हुकूमशाही सरकारविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही JAAC चे सदस्य अमन खान करत आहेत.

Follow Us