AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रशिया आणि अमेरिकेत होणार सर्वात मोठी डील, कराराकडे संपूर्ण जगाचं लक्ष

रशिया आणि अमेरिका यांच्यातील अण्वस्त्रांचे नियमन करणारा न्यू START करार (New Strategic Arms Reduction Treaty) येत्या पाच फेब्रुवारी 2026 ला संपणार आहे. मात्र हा करार आणखी एक वर्ष वाढवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोठी बातमी! रशिया आणि अमेरिकेत होणार सर्वात मोठी डील, कराराकडे संपूर्ण जगाचं लक्ष
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2025 | 9:48 PM
Share

रशिया आणि अमेरिका यांच्यातील अण्वस्त्रांचे नियमन करणारा न्यू START करार (New Strategic Arms Reduction Treaty) येत्या पाच फेब्रुवारी 2026 ला संपणार आहे. मात्र हा करार आणखी एक वर्ष वाढवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्याकडून अमेरिकेला ऑफर देण्यात आली आहे, जर डोनाल्ड ट्रम्प तयार असतील तर न्यू स्टार्ट करार आणखी एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. हा करार केवळ अमेरिका आणि रशियासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कारण या करारामुळे रशिया आणि अमेरिका यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या मर्यादीत राहाते.

काय आहे न्यू START करार

न्यू START करार अर्थात (New Strategic Arms Reduction Treaty) हा 2010 मध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये झाला, या कराराचा उद्देश हा रशिया आणि अमेरिकेमध्ये सुरू झालेली अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा मर्यादीत करणं हा आहे. या करारातंर्गत दोन्ही देशांमध्ये निर्माण होणाऱ्या अण्वस्त्रांवर नियंत्रण आले आहे. या कराराची मुदत आता येत्या पाच फेब्रुवारी  2026 संपत आहे. त्यामुळे हा करार पुन्हा एकदा एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो अशी ऑफर आता रशियाकडून अमेरिकेला देण्यात आली आहे.

हा करार वाढवणं का गरजेचं?

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, गेल्या तीन वर्षांपासून हे युद्ध सुरूच आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. रशिया आणि युक्रेनने युद्धविरामाची घोषणा करावी यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. रशियानं तर असा देखील आरोप केला आहे की, एकीकडे युरोपीयन संघ दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करत असल्याचं भासवतो, मात्र दुसरीकडे युक्रेनला त्यांच्याकडून शस्त्रांचा पुरवठा सुरूच आहे. अमेरिका आणि रशियामधील संबंध सध्या मोठ्या प्रमाणात तणावाचे बनले आहेत.

ट्रम्प यांची भूमिका काय?

ट्रम्प यांनी देखील हा करार वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, या करारामध्ये आता चीनचा देखील समावेश करावा. त्यामुळे आता हा करार होणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.