Bill Melinda Gates divorce : बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट, कारण काय?

| Updated on: May 04, 2021 | 3:38 AM

प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा यांनी घटस्फोट घेतलाय. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय.

Bill Melinda Gates divorce : बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट, कारण काय?
Follow us on

वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतलाय. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मागील 27 वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत असल्याचं सांगितलं. (Bill Gates announces divorce from wife Melinda release joint statement).

घटस्फोटाचं कारण काय?

बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी संयुक्त पत्रकात म्हटलं, “आम्ही खूप विचाराअंती आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांच्या प्रवासात आम्ही 3 मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.”

“भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती,” असंही बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या पत्रकात म्हटलं.

कोण आहे बिल गेट्स?

बिल गेट्स (Bill Gates) यांनी 1975 मध्ये तारुण्यात अर्ध्यावरच आपलं कॉलेज सोडलं. त्यानंतर ते न्यू मॅक्सिकोमध्ये अल्बुकर्क (Albuquerque) येथे आले. या ठिकाणी त्यांनी आपला लहानपणीचा मित्र पॉल एलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. 2018 मध्ये पॉल एलन यांचा मृत्यू झाला. 1980 मध्ये मायक्रोसॉफ्टने आयबीएमसोबत (IBM) एकत्र येऊन ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) तयार केली. नंतर ही सिस्ट एम एस डॉस (MS-DOS) नावाने ओळखली गेली.

मायक्रोसॉफ्ट 1986 मध्ये खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचली. त्यानंतर एका वर्षातच वयाच्या 31 व्या वर्षी बिल गेट्स जगातील अब्जपती बनले. ते सर्वात कमी वयाचे अब्जपती ठरले. गेट्स 2000 पर्यंत कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने “बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन” (Bill and Melinda Gates Foundation NGO) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेट्स आपला सर्वाधिक वेळ या संस्थेच्या कामासाठीच देतात. याचाच भाग म्हणून त्यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये स्वतः जाऊन भेटी दिल्या. तसेच या देशांमधील महत्त्वाचे प्रश्न समजून घेत त्यात कामासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा :

Bill Gates On Corona Vaccine | बिल गेट्सचं भारतविरोधी वक्तव्य ?, म्हणतात विकसनशील देशांना लसीचा फॉर्म्यूला देऊ नये

‘2021 हे जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष’; बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे वार्षिक पत्र प्रसिद्ध

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

व्हिडीओ पाहा :

Bill Gates announces divorce from wife Melinda release joint statement