AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी कोरोना संसर्गाबद्दल चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. (Bill Gates Corona Virus)

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा
| Updated on: Dec 14, 2020 | 11:40 AM
Share

न्यूयॉर्क: कोरोना विषाणूचा सर्वात फटका महासत्ता असलेल्या अमेरिकेला सर्वाधिक बसला आहे. अमेरिकेत 1 कोटी 60 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे सर्वाधिक तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. कोरोनावरील फायझरच्या लसीच्या वापराला अमेरिकेने परवानगी दिली आहे. मात्र, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी कोरोना संसर्गाबद्दल चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. बिल गेटस् यांनी आगामी चार ते सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होणार असल्याचा इशारा दिला आहे. (Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)

बिल गेटस यांनी सीएनएनशी बोलताना पुढील चार ते सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होणार असल्याचा इशारा दिला. इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मैट्रिक्स अँड इव्यल्यूएशन यांसस्थेच्या अंदाजाचा बिल गेटस यांनी दाखला दिला. आयएचएमई या संस्थेने पुढील काळात कोरोनामुळे दोन लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बिल गेटस यांनी कोरोना संसर्गापासून वाचण्यसाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन हाच उपाय असल्याचं सांगितले. पुढील काळात अमेरिकेत संक्रमण, मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होणारांची संख्या विक्रमी असेल, असं म्हटलं आहे. (Bill Gates warns for worse corona situation in upcoming months)

गेटस यांनी 2015 मध्ये एक भविष्यवाणी केली होती. बिल गेटस यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत बोलताना हा विषाणू सध्या जितका धोकादायक आहे. त्यापेक्षा अधिक धोकादायक असेल, असं म्हटलं. आपण अजून वाईट परिस्थिती पाहिली नाही. (Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)

अमेरिकेत कोरोना लसीकरणाला सुरुवात

अमेरिकेत  फायझर लसीच्या  तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना  लशीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली. लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. (Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)

फायझर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे. खरंतर, मागील गुरुवारीच, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार पॅनेलवरील फायझर-बायोनोटेकच्या सल्लागार एक्सपर्ट पॅनेलने यावर बैठक घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला होका. अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने ​वापराला परवानगी देण्यात आली.

संबंधित बातम्या:

अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस

अमेरिकेत लसीकरणाची मोठी तयारी, मेक्सिकोचीही फायझरच्या लसीला परवानगी

(Bill Gates warns for worse corona virus situation in upcoming months)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.