Bill Gates | बिल गेट्स यांच्याकडून भारताचं अभिनंदन, कोरोना लसीकरणावर म्हणाले..

| Updated on: Jan 05, 2021 | 11:17 AM

अमेरिकन उद्योजक बिल गेटस यांनी भारताच्या वैज्ञानिक नाविन्यता कोरोना लस निर्मिती क्षमतेचे कौतुक केले आहे. (Bill Gates Narendra Modi)

Bill Gates | बिल गेट्स यांच्याकडून भारताचं अभिनंदन, कोरोना लसीकरणावर म्हणाले..
बिल गेटस, नरेंद्र मोदी
Follow us on

न्यूयॉर्क: मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस (Bill Gates) यांनी भारताचे कौतुक केले आहे. बिल गेटस यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करुन भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील नावीन्य पूर्णता आणि कोरोना लसीच्या उत्पादनाची क्षमतेतील नेतृत्व याविषयी प्रशंसा केली आहे. ज्यावेळी जग कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध लढतंय त्यावेळी भारतात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु होतेय, हे पाहताना आनंद होतो, असं बिल गेटस म्हणाले.( BIll Gates appreciate India’s leadership in scientific innovation and vaccine manufacturing capability)

भारत सरकारच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं सीरम इनस्टिट्यूटच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना भारत लवकरच जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करणार असल्याचं सांगितले होते. याबाबतची बातमी शेअर करत बिल गेटस यांनी भारताचं कौतुक केलं आहे. बिल गेटस यांनी ‘भारताची वैज्ञानिक नावीन्यता आणि लस उत्पादनाच्या क्षमतेतील नेतृत्व पाहून आनंद होतो, असं म्हटलं.

बिल गेटस यांचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना भारत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगितले होते. नॅशनल मेट्रोलॉजी कानक्लेव्हमध्ये नरेंद्र मोदींनी भारतातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं कौतुक केले होते. नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना शास्त्रज्ञांना भारतामध्ये बनवलेल्या वस्तू किंवा उत्पादनांना जागतिक स्तरावरील मागणी असेल तर त्याला स्वीकारले गेले आहे. भारतीय उत्पादनांच्या संख्येच्या तुलनेत गुणवत्ता महत्वाची असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, रविवारी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सीरम इनस्टिट्यूटच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. लसीकरणच्या तयारीसाठी भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. तर, लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असून ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रात लसीकरण राबवणार असल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.

संबंधित बातम्या

( BIll Gates appreciate India’s leadership in scientific innovation and vaccine manufacturing capability)

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

कंपन्या विदेशी पण राज्य भारतीयांचं !, ‘हे’ आहेत जगातील मोठ्या कंपन्यांचा कारभार पाहणारे भारतीय सीईओ