2 नव्हे तर 3 लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी? वाचा अजून एक गुड न्यूज

2 नव्हे तर 3 लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी? वाचा अजून एक गुड न्यूज

भारताच्या औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे.

अक्षय चोरगे

|

Jan 04, 2021 | 7:04 AM

नवी दिल्ली : गेल्या 10-11 महिन्यांपासून कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगभरातील लोकांना वेठीस धरले आहे. या आजारावरील प्रभावी अशा लसींच्या आपत्कालीन वापराला जगभरातील अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान रविवारी (3 जानेवारी) भारतसियांसाठीदेखील एक दिलासादायक बातमी मिळाली. भारताच्या औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान अजून एका भारतीय लसीने आपत्कालीन वापरासाठीची मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे. झायडस कॅडिला या कंपनीच्या जायकोव-डी या लसीच्या अंतिम ट्रायलला (ह्युमन ट्रायलला) परवानगी देण्यात आली आहे. (Zydus cedilla Corona vaccine get enter in third phase of clinical trial)

झायडस कॅडिलाद्वारे विकसित करण्यात आलेली लस ही देशातील पहिली डीएनए व्हॅक्सिन (DNA Vaccine) आहे. या लसीने आपत्कालीन वापराला मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल टाकले आहे. तिसऱ्या चरणातील या लसीच्या ट्रायलनंतर कंपनी या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

आठवडाभरात लसीकरण

डीसीजीआयने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. तर झायडस कॅडिलाच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच या आठवडाभरातच फ्रंटलाईन वर्कर्सना लस टोचली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं.

DNA व्हॅक्सिनचे तीन डोस गरजेचे

झायडस कॅडिलाने भारतात एक हजाराहून अधिक वॉलेंटियर्सवर या डिएनए व्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण केल्या आहेत. पीआयबीच्या रिपोर्टमधील दोन्ही टप्प्यांमधील ट्रायल्सच्या डेटानुसार या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर थोड्याच दिवसाच्या अंतराने तिसरा डोस घ्यावा लागेल. त्यानंतर ही लस अधिक सुरक्षित आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे असं म्हटलं जातंय की, कोरोना आजाराविरोधात या लसीचे तीन डोस घेणे गरजेचे असेल.

दोन डोस देणार

मंजुरी देण्यात आलेल्या दोन्ही व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकणार आहे. तसेच रुग्णाला दोन्ही इंजेक्शनचे दोन-दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम होणार असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

5 कोटी डोस तयार

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनिकाच्या कोव्हिशिल्डच्या उत्पादनाचं काम सीरम इन्स्टिट्यूटला मिळेलालं आहे. सीरमच्या दाव्यानुसार कोरोनाच्या नव्या संसर्गावरही ही व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. कोरोना संसर्गात फारसा बदल झालेला नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळेच ही व्हॅक्सिन अधिक परिणामककारक ठरण्याची शक्यता आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी यापूर्वीच या व्हॅक्सिनचे 5 कोटी डोस तयार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

लसीची किंमत?

सीरमने खासगी कंपन्यासाठी या लसीची किंमत प्रति डोस एक हजार रुपये ठेवली आहे. तर भारत सरकारला 200 रुपयात एक डोस देण्यात येणार आहे. म्हणजे या व्हॅक्सिनच्या दोन डोसची किंमत 400 रुपये असणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. शिवाय देशातील गोरगरीबांनाही ही लस मोफत मिळावी म्हणून केंद्राकडून लवकरच काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (DCGI approves Serum, Bharat Biotech vaccine for restricted use)

संबंधित बातम्या:

आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी

शरीराला निरोगी राखण्यात मदत करतील ‘ही’ डीटॉक्स ड्रिंक्स, डाएटमध्ये नक्की सामील करा!

(Zydus cedilla Corona vaccine get enter in third phase of clinical trial)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें