AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपन्या विदेशी पण राज्य भारतीयांचं !, ‘हे’ आहेत जगातील मोठ्या कंपन्यांचा कारभार पाहणारे भारतीय सीईओ

गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‌ॅडोब, पालो अल्टो नेटवर्क अशा जगप्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओ पदावर भारतीय व्यक्ती कायर्रत आहेत. (Top Indian CEOs )

कंपन्या विदेशी पण राज्य भारतीयांचं !, 'हे' आहेत जगातील मोठ्या कंपन्यांचा कारभार पाहणारे भारतीय सीईओ
सुंदर पिचई, निकेश अरोरा, सत्या नडेला, शंतनू नारायण
| Updated on: Jan 03, 2021 | 1:54 PM
Share

नवी दिल्ली: जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीय लोकांच्या हातात आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‌ॅडोब, पालो अल्टो नेटवर्क अशा जगप्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओ पदावर भारतीय व्यक्ती कायर्रत आहेत. निकेश अरोरा, सत्या नदेला, शंतनू नायायण, सुंदर पिचई हे सर्वजण जगभरात त्यांच्या कामगिरीनं भारताची मान उंचावत आहेत. निकेश अरोरा ते सुंदर पिचई त्यांच्या कंपन्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. (Top Indian CEOs in world largest companies)

सुंदर पिचई : गुगल, अल्फाबेट (Sundar Pichai)

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलच्या सीईओ पदावर सुंदर पिचई कार्यरत आहेत. 2004 मध्ये त्यांनी गुगलसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. सुंदर पिचई यांची अल्फाबेट कंपनीच्या सीईओ पदावर बढती झाली आहे. लॅरी पेज अँड सेरेजी ब्रीन कंपनी सोडल्यानंतर ते गुगल सोबत काम करु लागले होते. सुंदर पिचई यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता. पिचई यांनी आयआयटी, खरगपूरमधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते स्टॅनफोर्ड विद्यापीठ कॅलिफोर्निया येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले होते.

निकेश अरोरा : पालो अल्टो नेटवर्क (Nikesh Arora)

उत्तर प्रदेशात जन्म झालेले निकेश अरोरा पालो अल्टो नेटवर्क कंपनीचे 2018 पासून सीईओ म्हणून कार्यरत आहेत. गुगलमध्ये काम केल्यानंतर निकेश अरोरांनी सॉफ्टबँक ग्रुपमध्ये 2014 पासून अध्यक्ष म्हणून काम केले आहे. निकेश अरोरांनी त्यांचं शिक्षण आयआयटी, भुवनेश्वर मध्ये पूर्ण केले. त्यानंतर ते बोस्टन कॉलेज, नॉर्थईस्टर्न विद्यापीठात शिकण्यासाठी गेले.

सत्या नडेला : मायक्रोसॉफ्ट (Satya Nadella)

प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदावर सत्या नडेला 2014 पासून काम करत आहेत. सत्या नडेला यांनी त्यांचे शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केले. कॉम्प्युटर इंजिनीअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर ते एम.एससी करण्यासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील विस्कॉन्सीन-मिलावूकी विद्यापीठातून त्यांनी एम.एससी पदवी पूर्ण केली. सत्या नडेला यांचा जन्म तेलुगू कुटंबामध्ये झाला आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यापूर्वी सत्या नडेला सन मायक्रोसिस्टीम्समध्ये कार्यकरत होते.

शंतनू नारायण : अ‌ॅडोब (Shantanu Narayen)

शंतनू नारायण सध्या जगप्रसिद्ध अ‌ॅडोब या कंपनीच्या सीईओ पदावर काम करत असून ते हैदराबादचे आहेत. 2007 पासून ते अ‌ॅडोबचे चेअरमन आणि सीईओ म्हणून ते काम पाहत आहेत. शंतनू नारायण यांनी उस्मानिया विद्यापीठ, हैदराबादमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून शंतून नारायण यांनी मास्टर ऑफ बिझनेस हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नारायण यांनी अ‌ॅडोबला जॉईन होण्यापूर्वी अ‌ॅपल कंपनीत काम केले आहे.

संबंधित बातम्या:

LIC New Jeevan Shanti Yojana: एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर 74,300 रुपये पेन्शन मिळवा

Amazonवर ‘मेगा सॅलरी डे सेल’ सुरु, टीव्ही-फ्रीज-एसी-लॅपटॉप-कॅमेरावर बंपर सूट!

(Top Indian CEOs in world largest companies)

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.