Plane Crash : पैशाने भरलेलं विमान हायवे वर कोसळलं, 15 ठार, लोकांची पैसे उचलण्यासाठी एकच पळापळ VIDEO

Plane Crash : सोशल मीडियावर या विमान अपघाताचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. यात हायवे वर विमानाचा ढिगारा, जळालेल्या गाड्या आणि मृतदेह विखरुन पडलेले दिसतायत.

Plane Crash : पैशाने भरलेलं विमान हायवे वर कोसळलं, 15 ठार, लोकांची पैसे उचलण्यासाठी एकच पळापळ VIDEO
Bolivia military plane crash
Image Credit source: social media
| Updated on: Feb 28, 2026 | 8:27 AM

भारतात अलीकडेच दोन मोठे विमान अपघात झाले. दोन चार्टर फ्लाईट्स कोसळली. यात एका अपघातात महाराष्ट्राने अजित पवार यांच्या रुपाने मोठा नेता गमावला. त्यानंतर याच आठवड्यात झारखंडहून दिल्लीला येणारं चार्टर विमान कोसळलं. यात काही लोकांनी आपेल प्राण गमावले. आता परदेशात असाच एक मोठा विमान अपघात झाला आहे. बोलिवियाची राजधानी ला पाज जवळ शुक्रवारी रात्री एक मोठा विमान अपघात झाला. एका कार्गो प्लेन कोसळलं. यावेळी विमानात असलेल्या 15 जणांचा मृत्यू झाला. हे विमान एअरपोर्टजवळ हायवेवर कोसळलं. तिथे उभ्या असलेल्या अनेक गाड्या सुद्धा या विमानाखाली आल्या. या विमानात प्रचंड पैसा होता. नोटांची बंडलं होती. दुर्घटनेनंतर हा सर्व पैसा रस्त्यावर सर्वत्र विखरुन पडलेला होता.

ही दुर्घटना राजधानी ला पाजला लागून असलेल्या एल अल्टो शहरात घडली. फायर चीफ पावले टोवर यांच्यानुसार या प्लेन क्रॅश मध्ये कमीत कमी 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहे. मृत विमानातील प्रवासी आहेत की हायवे वर थांबलेल्या गाड्यांमधील ते टोवर यांनी स्पष्ट केलं नाही. सोशल मीडियावर या विमान अपघाताचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. यात हायवे वर विमानाचा ढिगारा, जळालेल्या गाड्या आणि मृतदेह विखरुन पडलेले दिसतायत. या दुर्घटनेत 15 पेक्षा जास्त कार्सचं नुकसान झालं. अपघातानंतर एअरपोर्टवरुन सर्व उड्डाणं आणि लँडिंग स्थगित करण्यात आली आहेत.

अपघात इतका भयानक होता की..

हे बोलिविया एअर फोर्सचा हरक्यूलिस विमान होतं. बातम्यांनुसार सेंट्रल बँकेतून नवीन करन्सी नोट घेऊन हे विमान दुसऱ्या शहारात चाललेलं. अपघात इतका भयानक होता की, विमान कोसळताच नोटांची बंडलं जमिनीवर चारही दिशांना दूरवरपर्यंत विखुरलेली होती. त्यानंतर एकच गडबड, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

फोटोंमधून एक वेगळं दृश्य पहायला मिळालं

सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमधून एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. एकाबाजूला रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं तेच दुसऱ्या बाजूला लोकांची पडलेले पैसे उचलण्यासाठी गडबड सुरु होती. लोक जमिनीवर पडलेले पैसे उचलताना दिसले. लोकांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

Follow Us