China-Pakistan Relation : आम्हाला फसवलं, पाकिस्तानचा चीनवर मोठा आरोप

China-Pakistan Relation : पाकिस्तानचा भ्रम तुटला आहे. आपल्याला चीनने फसवलं हे आता पाकिस्तानला कळून चुकलय. त्यामुळे पाकिस्तानला आता दुसरा विचार करावा लागणार आहे. पाकिस्तानने त्या दृष्टीने दुसऱ्या पर्यायांचा विचार सुरु केलाय. पाकिस्तानात चीन विरोधात एक असंतोष आहे.

China-Pakistan Relation : आम्हाला फसवलं, पाकिस्तानचा चीनवर मोठा आरोप
पाकिस्तान सैन्य आणि शाहबाज शरीफ
| Updated on: Jun 07, 2025 | 1:02 PM

पाकिस्तान चीनच्या जाळ्यात फसला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रॅगनची जादू फुस्स झाली. पाकिस्तानचा आता आपल्या मित्रावर विश्वास उरलेला नाही. पाकिस्तानमध्ये HQ-9B आणि HQ-16 या एअर डिफेन्स सिस्टिमवरुन मोठा असंतोष आहे, असा चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. या एअर डिफेन्स सिस्टिमची डिझाइन भारताच्या ब्राह्मोस सारख्या मिसाइलला इंटरसेप्ट करण्यासाठी बनवण्यात आलेली नाही, हे चीनने कबूल केल्यानंतर पाकिस्तानची नाराजी अजून वाढली.

ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार प्रहार झाल्यानंतर हा वाद समोर आलाय. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि सैन्य ठिकाणांवर अचूक हल्ले केले. यात ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइलचा वापर करण्यात आला. ब्रह्मोसला रोखण्यात पाकिस्तानला अपयश आलं. भारताने ब्रह्मोसच्या बरोबरीने फ्रान्सच SCALP मिसाइल आणि इस्रायली हारोप ड्रोनचा वापर केला.

चीनने कबुली दिल्याने असंतोष वाढला

पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम खासकरुन HQ-9B (लॉन्ग रेंज) आणि HQ-16 (मीडियम रेंज)वर आधारित आहे. ही सिस्टिम भारताच्या ब्रह्मोस सारख्या मिसाइलला रोखण्यात असमर्थ आहे. भारताने पाकिस्तानच्या पंजाबमधील चुनियां येथील चिनी YLC-8E अँटी-स्टेल्थ रडार सिस्टिम सुद्धा हल्ल्यात नष्ट केली. यावर चीनने स्पष्टीकरण दिलं की, ब्रह्मोस सारखी मॅक 3 स्पीडने कमी उंचीवरुन उडणारी, रॅमजेट इंजिनने ऑपरेट होणारी मिसाइल सिस्टिम त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमच्या रेंजबाहेर आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, या सिस्टिमच्या क्षमतेबद्दल चीनने आधी माहिती दिली नव्हती. चीनकडून आपली फसवणूक झाली. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला पराभव झाला, असं पाकिस्तानच म्हणणं आहे.

पाकिस्तानकडे आता पर्याय काय?

पाकिस्तान त्यांची 82 टक्के शस्त्र आयात करतो. HQ-9B ची तुलना अमेरिकेच्या पॅट्रियट सिस्टमशी केली जायची. युक्रेन युद्धात पॅट्रियट सिस्टम सरस ठरली. चीनची सिस्टिम आता टिकाकारांच्या रडारवर आहे. पाकिस्तान आता पर्यायांवर विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आता तुर्कीच्या SİPER 1 आणि SİPER 2 सिस्टिममध्ये इंटरेस्ट दाखवत आहे. ही सिस्टिम चांगली रडार क्षमता आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाविरोधात मजबूत मानली जाते.