AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेम्‍स बॉन्‍डच्या सिनेमासारखंच घडलं… ब्रिटिश गुप्तचर एजन्सी MI6च्या प्रमुखपदी पहिल्यांदाच महिला; कोण आहे ती?

Britain News : MI6च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची संस्थेची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोण आहे ती महिला ?

जेम्‍स बॉन्‍डच्या सिनेमासारखंच घडलं... ब्रिटिश गुप्तचर एजन्सी MI6च्या प्रमुखपदी पहिल्यांदाच महिला; कोण आहे ती?
Blaze Metreweli
| Updated on: Jun 24, 2025 | 10:55 AM
Share

My name is Bond, James Bond… आपल्यापैकी बहुतांश लोकांनी हा डायलॉग एकदा तरी ऐकला असेलच. हॉलिवूडच्या प्रसिद्ध जेम्स बाँड चित्रपटाचे असंख्य चाहते असून गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक अभिनेत्यांनी ही भूमिका चखपणे साकारली आहे. या चित्रपटांमध्ये, मिस्‍टर 007 म्हणजेच जेम्स बाँड हा एक गुप्तहेर आहे, जो त्याचे सर्व आदेश ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेकडून म्हणजेच M16 कडून घेत असतो. भलेही प्रत्येक चित्रपटात जेम्स बाँडला ऑर्डर देणारी MI6ची डायेक्टर ही महिला दाखवण्यात आली असली तरी आता चित्रपटाची हीच कहाणी प्रत्यक्षात आली आहे. कारण ब्रिटनच्या 116 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच M16 या गुप्तचर संस्थेचे नेतृत्व एक महिलेकडे सोपवण्यात आलं आहे.

ब्लेझ मेट्रेवली असं या महिलेचं नाव अलून ती 47 वर्षांची आहे. तिच्याकडे आता M16ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ब्लेझ मेट्रेवली यांची निवड केली आहे. 1906 साली M16 या गुप्तचर संस्थेची स्थापना झाली असून तेव्हापासून या संस्थेच्या प्रमुखपदी एकही महिला नव्हती, मात आता ब्लेझ यांची संस्थेची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रेवेली हिने 1999 साली MI6 जॉईन केलं. ती पूर्वी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विभागाच्या म्हणजेच ‘Q’ च्या संचालक म्हणून काम करत होती. आता MI6 चा कार्यभार स्वीकारल्यानंतर, तिची नवीन भूमिका ‘C’ झाली आहे.

कोण आहे ब्लेझ मेट्रेवली ?

ब्लेझ मेट्रेवेलीची पार्श्वभूमी प्रभावी आहे. तिने केंब्रिज विद्यापीठातून मानववंश शास्त्रात पदवी घेतली., 1997 साली महिला बोट रेसमध्ये भाग घेतला होता आणि मध्य पूर्व आणि युरोपमध्ये सक्रिय क्षेत्रीय कार्यात दशके घालवली. तिने MI5 मध्ये संचालक-स्तरीय भूमिका देखील सांभाळल्या, जिथे त्यांनी दहशतवाद आणि हेरगिरी यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी योगदान दिले. 2024 साली, मेट्रेवली हिवा ब्रिटिश परराष्ट्र धोरणातील योगदानाबद्दल ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अँड सेंट जॉर्ज (CMG) प्रदान करण्यात आले.

मोठी जबाबदारी आणि आव्हानही

मला माझ्या नवीन भूमिकेबद्दल अभिमान आणि सन्मान वाटतो, असं MI6 चे नेतृत्व स्वीकारणाऱ्या मेट्रेवेली म्हणाली. “MI6, MI5 आणि GCHQसह, ब्रिटिश नागरिकांचे संरक्षण करण्यात आणि यूकेच्या हितांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.” रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया सारख्या देशांकडून धोके वाढत असताना तिला आव्हानांचा सामना करावा लागेल. डिजिटल युगात जिथे बायोमेट्रिक पाळत ठेवण्याचा आणि सायबर धोक्यांचा धोका वाढला आहे, तिथे MI6 ला तांत्रिक नवोपक्रमांशी जुळवून घ्यावे लागेल.

हे ऐतिहासिक पाऊल

पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या नियुक्तीचे वर्णन “ऐतिहासिक” असंकेलं. गुप्तचर सेवांचे काम कधीही इतके महत्त्वाचे नव्हते. मेट्रेव्हेलीचा अनुभव आणि नेतृत्व जागतिक अस्थिरतेच्या काळात ब्रिटनला मजबूत स्थितीत आणेल. आधुनिक गुप्तचर सेवा विविधता आणि समावेशकता स्वीकारण्यास तयार आहेत असा संदेशही ही नियुक्ती देते. मेट्रेवली ही रिचर्ड मूर यांची जागा घेणार आहे. रिचर्ड मूर यांनी पाच वर्षे एजन्सीचे प्रमुख म्हणून काम केले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.