
युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेतच अशांतता समोर आली. प्रसार माध्यमांसमोरच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यात किरकिर झाली. पण इंग्लंडचे पंतप्रधान केरी स्टार्मर यांनी झेलेंस्की यांची गळाभेट घेतली. त्यांनी त्यांची पाठ थोपटली. इतकेच नाही तर रशियाला डोळे दाखवत युक्रेनला मोठी आर्थिक मदत कर्ज रुपाने सुद्धा दिली. ब्रिटन युक्रेनच्या पाठीशी असल्याचा संदेश जगाला दिला. या सर्व घडामोडींमुळे जगाचा नकाशा लवकरच बदलण्याची अटकळ बांधण्यात येत आहे.
248 अब्जांची मदत
युक्रेन आणि आणि इंग्लंडमध्ये शनिवारी 2.26 अब्ज पाऊंड, 2,48,63,86,46,000 रुपये कर्ज देण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. ही आर्थिक मदत युक्रेन सुरक्षेसाठी वापरणार आहे. युक्रेन आणि रशियात गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. त्यात झेलेंस्की हे एकटे पडल्याचे अनेकदा दिसून आले. पण फ्रान्स, युरोप आणि आता इंग्लंड या दोस्त राष्ट्रांनी त्यांची बाजू भक्कम केली आहे. यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला. त्याला झेलेंस्की यांनी सुद्धा तितकेच कडक उत्तर दिले. हे उभ्या जगाने पाहिले.
युनायटेड किंगडम युक्रेनच्या पाठीशी
इंग्लंडचे पंतप्रधान केरी स्टार्मर आणि राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांची ग्रेट भेट झाली. त्यावेळी स्टार्मर यांनी युक्रेनच्या पाठीशी युनायटेड किंगडम खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. ब्रिटेनची ही भूमिका अगदी सहज घेण्यासारखी नाही. आता युरोपातील राष्ट्रांनी अमेरिकेच्या दादागिरीला भीक घालत नसल्याचा हा मोठा मॅसेज डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचे मानले जात आहे. हा थेट रशियाला इशारा नाही तर अमेरिकेला आणि ट्रम्प यांच्या धोरणाला उघड उघड विरोध असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 10 डाउनिंग स्ट्रीट वरून जगाचा नकाशा बदलण्याच्या हालचाली दिसून आल्या. युरोपियन राष्ट्रे अमेरिकेला डोळे दाखवत असल्याचे दिसून येत आहे. ग्रेट ब्रिटनने युक्रेनला संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 2,48,63,86,46,000 रुपये कर्ज देण्याचा करार केला आहे.