AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईची शान असलेल्या बुर्ज खलिफामध्ये फ्लॅटच किंमत किती आहे? मुंबईपेक्षा कमी की जास्त ?

दुबईतील बुर्ज खलिफामध्ये असणाऱ्या आलिशान घरांची किंवा फ्लॅटची किंमत माहितीये का? मुंबईतील घराच्या किंमतीत बुर्ज खलिफामधील घरांच्या किंमती कमी असतात का? बुर्ज खलिफा फ्लॅटच्या किंमती म्हणजे परवडणारी लक्झरी आहे का? जाणनू आश्चर्य वाटेल.

दुबईची शान असलेल्या बुर्ज खलिफामध्ये फ्लॅटच किंमत किती आहे? मुंबईपेक्षा कमी की जास्त ?
| Updated on: Jan 10, 2025 | 4:51 PM
Share

स्वत:चं घर घेणं हे सर्वांचच स्वप्न असतं. मुळात म्हणजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेच मेहनत घेत असतात. आपल्या बजेटमध्ये बसणारं, सुंदर असं घर घेणं म्हणजे आपली मेहनतीची, काटकसरीची सर्व कमाई एकाचवेळी आपल्या स्वप्नात गुंतवण्यासारखं असतं. मग तसं घर शोधण्यासाठी कित्येक वर्ष आणि कित्येक ठिकाणं शोधून काढतो.

बुर्ज खलिफामध्ये असणाऱ्या घरांची किंवा फ्लॅटची किंमत

काहीजणांचं तर मुंबईत घरं घेणं हे सर्वात मोठं स्वप्न असतं. पण मुंबईत घर घेणं म्हणजे सध्याच्या काळी कसोटीच आहे. इथं काही स्केवर फुटांच्या घरांसाठी कोट्यवधी रुपये मोजले जातात. मुंबईप्रमाणेच दुबईमध्येही घरं घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. दुबईतील बुर्ज खलिफामध्ये घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण तुम्हाला बुर्ज खलिफामध्ये असणाऱ्या घरांची किंवा फ्लॅटची किंमत माहितीये का?

कधीतरी दुबईला फिरायला जावं, असा विचार अनेकदा आपल्या मनात नक्कीच येतो. जगभरातील पर्यटकांच्या आवडत्या शहरामध्ये याचा समावेश होतो. इथंल्या गगनचुंबी इमारती आणि वास्तूशैली बघणाऱ्या मंत्रमुग्ध करुन टाकतात. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ही तर आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जातो. ती इमारत पाहणं म्हणजे दुबईला जाण्याचं मुख्य कारण असतं.

दुबईची बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. त्यात अनेक आलिशान घरे आहेत.828 मीटर उंच असलेली ही इमारत आयफेल टॉवरपेक्षा तिप्पट उंच आहे. यात 163 मजले, 58 लिफ्ट, 2957 पार्किंग स्पेस, 304 हॉटेल रूम, 37 ऑफिस फ्लोर आणि 900 लक्झरी अपार्टमेंट आहेत.

आलिशान एक आणि दोन बेडरूमचे अपार्टमेंट

यात 9 ते 16 मजल्यावरील अरमानी निवासस्थानांमध्ये आलिशान एक आणि दोन बेडरूमचे अपार्टमेंट आहेत. 45 ते 108 मजल्यांवर एक ते चार बेडरुम असणारे आलिशान खाजगी अपार्टमेंट आहेत. दुबईच्या एका गृहनिर्माण वेबसाइटनुसार, बुर्ज खलिफामधील अपार्टमेंटमध्ये 1 BHKची किंमत आहे 3 करोडच्या घरात, 2 BHK 5 करोडच्या घरात आहे तर, 3 BHKची किंमत 14 कोटी रुपये आहे.

याव्यतिरिक्त, बुर्ज खलिफातील 21000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले सर्वात मोठे पेंटहाऊसही आहे. त्याची किंमत अंदाजे 240 कोटी रुपये आहे. ही सर्व घरे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज आहेत.

मुंबईतही घरांच्या किमती…

मुंबईतही घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. गेल्या महिन्यात शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार जगदीश मास्टर यांच्या पत्नी उर्जिता जगदीश मास्टर यांनी एक अपार्टमेंट 105 कोटी रुपयांना खरेदी केला होता. नवीन खरेदी केलेले अपार्टमेंट 7130 स्क्वेअर फूटचे आहे. हे अपार्टमेंट ॲनी बेझंट रोडवर आहे.

अबुधाबीमध्येही बुर्ज खलिफामधील घरांच्या  किमती परवडणाऱ्या 

दरम्यान दुबईशिवाय अबुधाबीमध्येही एक बुर्ज खलिफा आहे. ही बुर्ज मोहम्मद बिन रशीदची इमारत आहे. बुर्ज खलिफाच्या धर्तीवरच ही देखील बांधण्यात आली आहे. या बुर्ज मोहम्मदला 92 मजले आहेत. त्याच वेळी, ते 7 वर्षांत तयार केले गेले आहे. यातील फ्लॅटची किंमत बुर्ज खलिफापेक्षा खूपच कमी आहे.

बुर्ज मोहम्मद बिन रशीदमध्ये 1 BHK म्हणजेच एका खोलीच्या फ्लॅटची किंमत 36 लाख रुपये आहे. या किमतीत तुम्ही येथे आरामात घर खरेदी करू शकता.बयुत यांच्या म्हणण्यानुसार, त्याच इमारतीतील 2 BHK म्हणजेच 2 खोल्यांच्या घराची किंमत 53 लाख रुपये आहे. त्यामुळे दुबईतील नाही तर किमान अबुधाबीमधल्या बुर्ज खलिफामध्ये तरी घरं घेणं नक्कीच शक्यतेचं वाटतं.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.