Pakistan Crisis : रिकामी खजिना, हातात कटोरा, अमेरिका सोडून पाकिस्तानच्या मदतीला जगातला एक देश उभा राहिला, भीकेमध्ये दिले 47 मिलियन डॉलर

Pakistan Crisis : पाकिस्तानची स्थिती सध्या बिकट आहे. मिळेल तिथून पैसा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पाकिस्तानची अर्थव्यवस्था वेंटिलेटरवर आहे. पाकिस्तान अमेरिका, सौदी कडून नेहमी आर्थिक मदत घेतचं असतो. पण यावेळी त्यांना एका नव्या देशाने मोठी आर्थिक मदत दिली आहे.

Pakistan Crisis : रिकामी खजिना, हातात कटोरा, अमेरिका सोडून पाकिस्तानच्या मदतीला जगातला एक देश उभा राहिला, भीकेमध्ये दिले  47 मिलियन डॉलर
Pakistan
| Updated on: Jul 24, 2026 | 3:53 PM

पाकिस्तान मागच्या काही काळापासून आर्थिक संकटात आहे. वारंवार त्यांना दुसऱ्या देशांकडे मदतीसाठी हात पसरावे लागत आहेत. त्यांची खराब आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. कंगालीच्या दलदलीत फसलेल्या पाकिस्तानची नियत पुन्हा एकदा जगासमोर उघड झाली आहे. सुपर पावर अमेरिकेसमोर नेहमीच हात पसरणाऱ्या पाकिस्तानने आता कॅनडाकडून आर्थिक मदत मागितली आहे. अब्जावधी रुपयांची भीक मागितली आहे. कॅनडाच्या भारतीय वंशाच्या परराष्ट्र मंत्री अनील आनंद यांच्या पाकिस्तान दौऱ्यावेळी ही आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीअंतर्गत पाकिस्तानला 47 मिलियन डॉलर्सचं पॅकेज मिळणार आहे. पाकिस्तानला ही मदत अशीच मिळणार नाही.

मागच्या दोन दशकात पहिल्यांदा कॅनडाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तान दौऱ्यावर गेले. शहबाज शरीफ सरकारने आपली दयनीय परिस्थिती मांडून फायदा उचलला. पाकिस्तानची परिस्थिती लक्षात घेऊन कॅनडाने सुरक्षा आणि विकासाच्या नावाखाली त्यांना 47 मिलियन डॉलर घसघशीत मदत देण्याची घोषणा केली. पाकिस्तानची अंतर्गत हालत सध्या खराब आहे. बलूचिस्तानातील विद्रोह आणि आपल्या भूमीवरील दहशतवादाने पाकिस्तान हैराण आहे. दुसरीकडे दुसऱ्या देशांकडून मदत मागून वेंटिलेटरवर असलेली आपली अर्थव्यवस्था जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेसह युरोपियन देशांकडे हात पसरणाऱ्या पाकिस्तानने आता कॅनडाकडून मदत मिळवण्यात यश मिळवलं आहे.

कॅनडासमोर काय रडगाणं गायलं?

कॅनडाकडून ही मेहरबानी पदरात पाडून घेतल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सवयीप्रमाणे भारतविरोधी अजेंडा रेटला. या हाय-प्रोफाइल भेटी दरम्यान पाकिस्तानने भारताविरोधात गरळ ओकण्याचं काम केलं. कॅनडासमोर सुद्धा भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याचं रडगाण गायलं. मागच्यावर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली होती. भारताचं ते रुप पाहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय मध्यस्थतेसाठी अमेरिकेकडे याचना केली होती.

भारताविरोधात पाकिस्तानची ही कूटनितीक चाल

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर पाकिस्तानी नेतृत्वाने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. भारताविरोधात पाकिस्तानची ही कूटनितीक चाल आहे. त्या शिवाय अनीता आनंद यांनी रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांची भेट घेतली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us