
अमेरिका जागतिक महासत्ता असली तरी मागच्या काही दिवसात घेतलेले निर्णय अंगलट येत असल्याचं दिसत आहे. खासकरून टॅरिफचा मुद्दा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. असं असताना अमेरिकेत पुन्हा का गन वॉयलेंसने डोकं वर काढलं आहे. युटा व्हॅली युनिवर्सिटीत एका कार्यक्रमात राइट विंग लीडर आणि टर्निंग पॉइंट युएसचे संस्थापक चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय किर्क यांची हत्या झाल्याने अमेरिकेत चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी होते. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 2024 साली महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे किर्क यांच्या हत्येने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. 10 सप्टेंबर रोजी किर्क युटा व्हॅली युनिवर्सिटीत टर्निंग पॉइंट युएसएसच्या अमेरिकन कमबऐक टूरचा भाग म्हणून ‘प्रूव्ह मी राँग’ या चर्चेत सहभागी होण्यासाठी गेले होते. तेव्हाच ही घटना घडली. चर्चा रंगली...