
आजच्या काळात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोनं खरेदी करणे हे भारतीयांसाठी, विशेषतः महिलांसाठी केवळ एक आवड नाही, तर ती एक परंपरा आणि गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्नसराई असो वा कोणताही सण, सोन्याच्या खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. पण वाढत्या भावांमुळे ‘सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं?’ हा प्रश्न अनेकदा समोर येतो. अनेकांना वाटते की दुबईमध्ये सोनं सर्वात स्वस्त मिळते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगात दुबईहूनही स्वस्त सोनं एका छोट्या देशात उपलब्ध आहे. तो देश म्हणजे भूटान
भूटानमध्ये सोनं स्वस्त का मिळतं?
भूटानमध्ये सोनं सर्वात स्वस्त दरात मिळण्याचे अनेक खास कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भूटानमध्ये सोन्यावर कोणत्याही प्रकारचा कर (Tax) लागत नाही. म्हणजेच, इथे सोनं पूर्णपणे ‘टॅक्स फ्री’ (Tax Free) आहे, ज्यामुळे त्याची किंमत खूप कमी होते. याशिवाय, इतर देशांच्या तुलनेत भूटानमध्ये सोन्यावर लागणारे आयात शुल्क (Import Duty) खूप कमी आहे. हेच दोन प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे भूटानमध्ये सोन्याची किंमत इतर देशांपेक्षा कमी असते.
भूटानमधून सोनं खरेदी करण्याचे नियम:
भूटानमधून सोनं खरेदी करायचे असल्यास, काही महत्त्वाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
1. एक रात्रीचा मुक्काम अनिवार्य: भूटानमधून सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला भूटान सरकारने अधिकृत केलेल्या हॉटेलमध्ये कमीत कमी एक रात्र मुक्काम करणे आवश्यक आहे. या नियमाचे पालन केल्याशिवाय तुम्ही भूटानमधून सोनं खरेदी करू शकत नाही.
2. भारतात सोनं आणण्याची मर्यादा: जर तुम्ही भूटानमधून सोनं खरेदी करून भारतात आणू इच्छित असाल, तर भारत सरकारने त्यासाठी एक मर्यादा निश्चित केली आहे. एक व्यक्ती भूटानमधून भारतात जास्तीत जास्त २६ ग्रॅम सोनं आणू शकतो.
नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई:
भूटानमधून 26 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं भारतात आणणे हे बेकायदेशीर मानले जाते. जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणताना पकडले गेलात, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, भूटानमधून सोनं खरेदी करताना तेथील आणि भारतातील दोन्ही देशांचे नियम व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही स्वस्त सोन्याचा लाभ घेऊ शकाल.