
चीनचा सर्वात मोठे दुश्मन म्हणून तुम्ही विचार अमेरिका किंवा भारताचा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहेत. कारण चीनचा सर्वात मोठा शत्रू कोणता देश नाहीतर त्यांच्या परिसरात पसरलेले विशाल वाळवंट आहे. हे वाळवंट चीनवर अनेक प्रकारे परिणाम करत आहे. आपल्या या नैसर्गिक शत्रू लढण्यासाठी चीनने वाळवंटाच्या चारही बाजूंनी एक ‘हरित बेल्ट’ (shelter belt) बनवण्याचा प्रोजेक्ट सुरु केला आहे. या प्रोजेक्टला ग्रेट ग्रीन वॉल ( Great Green Wall ) नावाने ओळखले जाते.
चीनच्या या शत्रूचे नावा तकलामकान वाळवंट असे आहे. हे वाळवंट शिनजियाच्या माकित काऊंटी क्षेत्राजवळ आहे. वाळवंटातून येणारी वाळू थोपवण्यासाठी चीनने या क्षेत्रात जगातील दुसरी सर्वात मोठी हरित भिंत तयार केली आहे. या भिंतीला ग्रेट ग्रीन वॉल नाव देण्यात आले आहे. या हरित बेल्टची लांबी 3,046 किलोमीटर आहे, जी चीनमध्ये वाळवंटाच्या वाढीस रोखण्यासाठी मोठी भूमिका बजावत आहे. ही भिंत जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत आहे.
या संदर्भातील माहितीनुसार चीनने ही मोठी भिंत केवळ 13 वर्षांत तयार केली आहे. एका बातमीनुसार चीनच्या लोकांच्या सहभागामुळे या अशक्य कार्याला शक्य करण्यात यश आले आहे. या क्षेत्रात राहणाऱ्या चीनी लोकांनी ३० हजार हेक्टर क्षेत्रात दुष्काळ सहन करणारी झाडे लावण्यास सुरुवात केली. रेतीच्या डोंगरांवर कृषी क्षेत्र सुरु केले. लोकांनी तकलामकान वाळवंटाच्या चारी दिशांनी 3,046 किलोमीटर लांबीची हिरवा पट्टा (shelter belt) बनवला आहे. ही हरित पट्टी वाळूच्या वादळानंतर बीजिंग क्षेत्रात ही वाळू जाण्यापासून वाचवते. आणि या क्षेत्रात पर्यटनाला चालना देत आहे.
चीनच्या एका न्यूज रिपोर्टच्यामते बीजिंगने वाळू नियंत्रण बेल्ट पूर्ण केला आहे. हा बेस्ट आतील क्षेत्रातील मंगोलियाच्या तीन वाळवंटी क्षेत्रांना जोडतो. हे उत्तर चीनमध्ये तयार केला जाणारा ग्रेट ग्रीन वॉलचे एक आणखी पाऊल आहे. चीनच्या न्यूज एजन्सीनुसार ड्रॅगन म्हटले जाणाऱ्या चीनने वाळवंटाला रोखण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले आहे.
चीनने त्याचे सर्वात मोठ्या वाळवंट – तकलामाकनच्या प्रभावाला आपलया हरित पट्टीद्वारे नियंत्रण करणे सुरु केले आहे. त्याने आपल्या उत्तर क्षेत्राला वाळवंटीकरण होण्यापासून रोखण्यासाठी वनीकरण आणि थ्री – नॉर्थ शेल्टरबेल्ट फॉरेस्ट प्रोग्रम जारी केला आहे. चीनच्या न्यूज रिपोर्टनुसार चीनसाठी हा वाळवंट मोठा धोका आहे, जो या क्षेत्राला गिळत चालला आहे. येथे दिवसेदिवस जमीनीचे रुपांतर सुख्या रेतीत होत चालले आहे.