भारतात हाहाकार! अरुणाचल प्रदेशबद्दल चीनचा झोप उडवणारा दावा, थेट म्हटले, ती जागा…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धाने जग जैरीस आले. यादरम्यानच आता जगाची झोप उडवणारा दावा चीनकडून करण्यात आला. चीनच्या या दाव्याने भारताचेही टेन्शन वाढले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यानंतर चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे.

भारतात हाहाकार! अरुणाचल प्रदेशबद्दल चीनचा झोप उडवणारा दावा, थेट म्हटले, ती जागा...
China claim Arunachal Pradesh
| Updated on: Apr 15, 2026 | 11:08 AM

इराण आणि अमेरिका युद्धात कुठेतरी थोडी शांतता बघायला मिळत आहे. यादरम्यानच आता चीनकडून धक्कादायक दावा भारताच्या अरुणाचल प्रदेशाबद्दल करण्यात आला. या दाव्याने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय. भारताने अवैध पद्धतीने कब्जा केल्याचेही त्यांनी म्हटले. चीनने दावा करत म्हटले की, जांगनान क्षेत्रात (अरुणाचल प्रदेश) काही ठिकाणांना नावे देण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी मंगळवारी याबाबत बोलताना म्हटले की, चीनच्या ग्लोबल टाईम्यच्या रिपोर्टनुसार, जांगनान हा चीनचा स्वत: चा आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशाला चीन जांगनान म्हणतो. भारत अवैध पद्धतीने तथाकथित अरुणाचल प्रदेशचा स्वीकार केला नाही. चीनने म्हटले की, जांगनानमधील नावे बदलण्याचा अधिकार फक्त आमच्याकडे आहे.

चीनकडून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यात आल्यानंतर भारतानेही मोठा इशारा दिला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले की, चीनकडून भारताच्या हद्दीत असलेल्या प्रदेशांच्या ठिकाणी नावे दिली जात आहेत, भारत हे कधीही सहन करणार नाही. काल्पनिक नावे त्यांच्याकडून दिली जात आहेत.

जियाकुन यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंध स्थिर आहेत. भारतासोबतचे संबंध अधिक चांगले करण्याकरिता किंवा स्थिर करण्याकरिता चीनकडून कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. आम्ही कायमच आशा ठेवतो की दोन्ही देशातील व्दिपक्षीय संबंध चांगले राहतील. चीन 2017 पासून अरुणाचल प्रदेशातील विविध क्षेत्रांचे नावे बदलून प्रकाशित करत आहे.

ज्यानंतर भारताकडून सतत यावर आक्षेप घेतला जात आहे. जांगनान हे अरुणाचल प्रदेशाचे चीनी नाव आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेश हा आमचा भाग असल्याचा दावा केला जातो. चीनने केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. चीनकडून पुन्हा एकदा कुरापतींना सुरूवात झाल्याचे बघायला मिळत आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये अरुणाचल प्रदेश हा कायमच वादाचा मुद्दा राहिला आहे. चीनकडून कायमच अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग दाखवला जात नाही.

Follow Us