Blackout Bomb : चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे, जगाला दाखवला ब्लॅकआऊट बॉम्ब, किती खतरनाक आहे हा बॉम्ब?

Blackout Bomb : अमेरिकेने इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करताना बंकर बस्टर बॉम्बची जगाला ताकद दाखवून दिली होती. आता चीनने त्याच्या एक पाऊल पुढे टाकत ब्लॅकआऊट बॉम्ब बनवला आहे. हा बॉम्ब किती खतरनाक आहे? काय घडवू शकतो? ते समजून घ्या.

Blackout Bomb : चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे, जगाला दाखवला ब्लॅकआऊट बॉम्ब, किती खतरनाक आहे हा बॉम्ब?
Blackout Bomb
Image Credit source: VideoGrab/SCMP
| Updated on: Jul 01, 2025 | 12:24 PM

अमेरिकेने इराणवर बंकर बस्टर बॉम्ब टाकून जगाला आपली ताकद दाखवली. चीनने त्यापुढे एक पाऊल टाकत नवीन बॉम्ब लॉन्च केला आहे. हा असा बॉम्ब आहे, ज्याच्या बळावर चीन आपल्या कुठल्याही शत्रुची बत्ती गुल करु शकतो. हा बॉम्ब इतका खतरनाक आहे की, दारुगोळ्याशिवाय मोठा विद्धवंस घडवू शकतो. वीज पुरवठा खंडीत करुन शत्रूची मिसाइल क्षमता ब्लॉक करण्याची या बॉम्बची क्षमता आहे. रहिवाशी वस्ती असो वा मिलिट्री बेस. हा बॉम्ब निर्णायक ठरेल असा चीनचा दावा आहे.

चीनचा हा ब्लॅकआऊट बॉम्ब चर्चेचा विषय बनला आहे. जिनपिंग सरकारने अजूनपर्यंत या बॉम्बला कुठलही नाव दिलेलं नाही. पण दावा केलाय की, हा बॉम्ब शत्रुच्या प्रदेशात अंधार करुन त्यांची मिसाइल क्षमता नष्ट करु शकतो. चीनचा सरकारी मीडिया साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या बॉम्बचा टीजर लॉन्च केलाय. त्यांनी म्हटलय की, “हा बॉम्ब जिथे पडेल, त्या 10 हजार वर्ग मीटरच्या क्षेत्रातील सर्व इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स ठप्प होतील. शत्रू इच्छा असूनही काही करु शकणार नाही”

कोणासाठी हा बॉम्ब काळ ठरेल?

चीनने विकसित केलेल्या या बॉम्बच वैशिष्ट्य म्हणजे जिथे हा बॉम्ब पडेल त्या 10 हजार वर्ग मीटरच्या क्षेत्रात अंधार होईल. चीनने हा बॉम्ब बनवण्यासाठी दारुगोळा वापरलेला नाही. मात्र, तरीही हा बॉम्ब विद्धवंस घडवू शकतो. शत्रूची कमांड कंट्रोल सिस्टिम आणि इलेक्ट्रिक सब स्टेशनसाठी हा बॉम्ब काळ ठरेल. वीज सब स्टेशनमध्ये या बॉम्बमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं.

बॉम्बच वजन आणि रेंज काय?

चीनच्या सरकारी टेलिव्हीजन चॅनलने या बॉम्बच एनिमेशन जारी केलं आहे. शी जिनपिंग यांच्या ब्लॅकआऊट बॉम्बचा हा पहिला टीजर मानला जात आहे. हा बॉम्ब कसा काम करतो, त्याची माहिती आहे. या बॉम्बला मिसाइल वॉरहेडमध्ये फिट केलं जातं. याचं वजन 490 किलो आहे. याची रेंज 290 किमी आहे. मिसाइल पडल्यानंतर होणाऱ्या छोट्या-छोट्या स्फोटात कार्बन फिलामेंट आहेत. वीजेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट घडवण्यासाठी हा बॉम्ब बनवलेला आहे.