US-China : वेनेजुएलाचा बदला चीन अमेरिकेकडून असा घेऊ शकतो, ट्रम्प यांच्या जीवाला लागला घोर

US-China : एक्सपर्ट्सच स्पष्ट मत आहे की, अमेरिकेने साथ दिली नाही, तर चीनसमोर टिकणं कठीण आहे. त्यामुळेच वेनेजुएलावरुन निर्माण झालेला तणाव आता चीन आणि अमेरिकेमध्ये संघर्षाचं कारण बनू लागला आहे.

US-China : वेनेजुएलाचा बदला चीन अमेरिकेकडून असा घेऊ शकतो, ट्रम्प यांच्या जीवाला लागला घोर
Weapon
Image Credit source: Daniel Ceng/Anadolu via Getty Images
| Updated on: Jan 05, 2026 | 12:40 PM

अमेरिकेने शनिवारी वेनेजुएलावर हल्ला करुन त्या देशाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सीलिया फ्लोरेस यांना बंधक बनवलं. या घटनेने जागतिक राजकारणात तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम अमेरिका आणि चीनच्या संबंधांवर झाला आहे. अमेरिकेला आता चिंता सतावतेय की, चीन तैवान विरोधात सैन्य कारवाईचं पाऊल उचलू शकतो. असं झाल्यास सगळ्या जगावर त्याचा परिणाम होईल. तैवान जवळ जापानच एक छोट्स बेट आहे, योनागुनी. या बेटापासून तैवान फक्त 70 मैल अंतरावर आहे. टोक्योपेक्षा योगागुनीपासून तैवान जवळ आहे. आधी ही जागा स्कूबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी ओळखली जायची. पण इथे आता फ्रंटलाइन चौकी आहे. इथे मोठ-मोठे रडार बसवण्यात आले आहेत. PAC-3 मिसाइल सिस्टिम तैनात आहे. सैन्य उपकरणांमुळे मोबाइल नेटवर्क प्रभावित होतय असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

योनागुनी बेट जपानच्या ओकिनावा प्रांताचा हिस्सा आहे. अमेरिकेसाठी ही जागा खूप महत्वाची आहे. अमेरिका आणि जापानमध्ये सुरक्षा करार आहे. त्यानुसार दोन्ही देश परस्परांच्या सुरक्षेसाठी तयार असतात. या करारातंर्गत अमेरिकेचे जवळपास 55 हजार सैनिक जपानमध्ये तैनात आहेत. यात 30 हजारपेक्षा जास्त सैनिक ओकिनावामध्ये आहेत. ओकिनावा तैवानपासून जवळपास 360 मैल अंतरावर आहे.

अणवस्त्रांची संख्या सुद्धा वेगाने वाढत आहे

चीनने मागच्या काही वर्षात आपली सैन्य शक्ती बळकट केली आहे. आज त्यांच्याकडे अमेरिकेच्या तुलनेत जास्त सैनिक, युद्धनौका आणि फायटर विमानं आहेत. चीनच्या अणवस्त्रांची संख्या सुद्धा वेगाने वाढत आहे. तैवान आमचा भाग आहे हे चीन वारंवार सांगत आहे. गरज पडल्यास बल प्रयोग करुन तैवान आपल्या नियंत्रणखाली आणू असं चीनचं म्हणणं आहे.

अमेरिकेची नवीन आणि शक्तीशाली शस्त्र होती

हा धोका लक्षात घेऊन अमेरिका आणि चीनने आपल्या सैन्य तयारीला गती दिली आहे. दोन्ही देशांनी अलीकडेच संयुक्त जॉइंट मिलिट्री एक्सरसाइज Resolute Dragon केलं. यात जवळपास 20 हजार सैनिक सहभागी झाले होते. या युद्धभ्यासात अमेरिकेची नवीन आणि शक्तीशाली शस्त्र होती.

Typhon मिसाइल सिस्टममधून टॉमहॉक मिसाइल डागता येऊ शकते. 1000 मैल या मिसाइलची मारक क्षमता आहे. नेमेसिस अँटी-शिप मिसाइल सिस्टिम शत्रुच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. अमेरिकेने योनागुनी बेटावर इंधन भरण्याची व्यवस्था केली आहे. सैनिकांना वेगवान गतीने तैनात करण्याचा अभ्यास केला जात आहे. त्याशिवाय अमेरिका फिलीपींस, दक्षिण कोरिया आणि गुआम येथील आपल्या सैन्य ठिकाणांना तैवानच्या संभाव्य संकटासाठी तयार करत आहे.

चीन आणि अमेरिकेमध्ये संघर्षाचं कारण

तैवान सुद्धा गप्प बसलेला नाही. त्यांनी आपलं संरक्षण बजेट वाढवून GDP च्या 3.3 टक्के केलं आहे. 2030 पर्यंत हे बजेट 5 टक्के करण्याची योजना आहे. अमेरिकेने तैवानमध्ये HIMARS रॉकेट सिस्टम, जैवलिन मिसाइल आणि अन्य शस्त्रास्त्र देण्याची घोषणा केली आहे. याच्या पुरवठ्याला थोडा वेळ लागेल.