व्हेनेझुएलानंतर आता पुढचा नंबर कोणाचा? अमेरिकेच्या रडारवर पुढचा देश कुठला? ट्रम्प यांचं जानेवारीच कॅलेंडर आलं समोर
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्रपती मादुरो यांना ताब्यात घेतले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. आता ट्रम्प यांची 2026 ची योजना उघड झाली असून, अनेक देश हे त्यांचे पुढील लक्ष्य आहेत. व्हेनेझुएलावर दुसऱ्या टप्प्यातील कारवाईची तयारीही सुरू आहे. अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शनिवारी अमेरिकेने व्हेनेझुएलावर (Venezuela) हल्ला चढवत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे आता व्हेनेझुएलावर आता अमेरिकेची सत्ता असेल. या कारवाईमुळे जगात मोठी खळबळ माजली असून ट्रम्प यांच्या निशाण्यावर पुढे कोण अशी भीतीही अनेकांच्या मनात आहे. कारवाईच्या भीतीने अनेक देशांची पाचावर धारण बसली असून अमेरिकेच्या रडावर पुढला कोणता देश असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत. व्हेनेझुएलारील कारवाईनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पुढली योजना आता उघड झाली असून त्यांचं जानेवारीचं कॅलेंडरच समोर आलं आहे.
ट्रम्प यांची जानेवारी 2026 ची योजना उघड झाली असून त्यानुसार, ट्रम्प हे प्रथम ग्रीनलँडवर हल्ला करू शकतात. ट्रम्प यांनी ग्रीनलँडला 20 दिवसांची मुदत दिली आहे. मला कोणत्याही किंमतीत ग्रीनलँड हवंय असं त्यांनी थेट, स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र दोन्ही देशांतील तणाव वाढेल, अशी विधान ट्रम्प यांनी करू नयेत असे ग्रीनलँडने म्हटले आहे. एवढंच नव्हे तर ग्रीनलंडशिवाय ट्रम्प यांच्या टार्गेटवर कोलंबिया, क्यूबा, मेक्सिको आणि ईराणही आहे. ट्रम्प यांनी या तिन्ही देशांना कडक इशारा दिला आहे.
जून 2025 मध्ये अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केल्याने इराणवर संकटाचे ढग पुन्हा दाटले आहेत. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला इशारा दिला आहे. दुसरीकडे, द टाईम्सनुसार, हल्ला झाल्यास, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी मॉस्कोला जाऊ शकतात.
व्हेनेझुएलाविरुद्ध राऊंड 2 ची तय्यारी
शनिवारी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर व्हेनेझुएला हादरलं आहे. तिथली परिस्थिती अजून शांत झालेली नसतानाच अमेरिका व्हेनेझुएलाला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिका व्हेनेझुएलावर दुसऱ्या टप्प्यातील कारवाईची तयारी करत आहे. व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारने त्यांचं ऐकलं नाही तर त्याचे परिणाम भयानक होतील असा थेट इशाराच एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
व्हेनेझुएलामध्ये, राष्ट्राध्यश्र मादुरो यांच्या अटकेनंतर, आता उपराष्ट्रपतींनाच अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जात आहे. नवीन सरकारने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रस्ताव व्हेनेझुएलाच्या नवीन सरकारने अमेरिकेला दिला आहे.
ट्रम्पची क्यूबालाही उघड धमकी
एवढंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही क्युबाला उघडपणे धमकी दिली आहे. तेथील लोकही नाखूष आहेत असं ते म्हणाले. खरंतर, मादुरोचे संरक्षण क्युबन सैनिक करत होते. क्युबन सरकारच्या म्हणण्यानुसार, मादुरोचे रक्षण करताना त्यांचे 32 सैनिक मारले गेले आहेत. क्युबा हा अमेरिकेचा कट्टर विरोधक देखील मानला जातो. क्युबामध्ये सध्या मिगुएल डियाझ-कॅनेलचे सरकार आहे.
आता अमेरिकेचे पुढचे पाऊल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
