चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?

| Updated on: May 04, 2021 | 11:39 PM

चीनने पाठवलेलं एक रॉकेट आता संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसलं आहे. हे रॉकेट कधीही पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. (chinese rocket fall back to earth)

चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, या देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?
rocket
Follow us on

बिजिंग : अंतराळात स्वत:चं स्पेश स्टेशन तयार करण्याच्या महत्वाकांक्षेतून चीनने पाठवलेलं एक रॉकेट आता संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसलं आहे. हे रॉकेट कधीही पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मिळेलेल्या माहितीनुसार या रॉकेटचे नाव लाँग मार्च 5- बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असून अंतरळात चीनकडून तयार करण्यात येत असलेल्या तियानहे स्पेस स्टेशनसाठी (Tianhe Space Station) त्याला अंतराळात पाठवण्यात आले होते. मात्र, पृथ्वीवर परतत असताना या चीनचे या रॉकेटवरील नियंत्रण सुटले. आता हेच रॉकेट कधीही पृथ्वीवर पडू शकते असे सांगितले जात आहे. (Chinese rocket got out of control while returning to earth may fall back to earth)

रॉकेटचे वजन तब्बल 21 टन

मिळालेल्या माहितीनुसार अंतराळात सध्या रॉकेटचा मुख्य भाग फिरतो आहे. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब आहे. याचे वजन तब्बल 21 टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात चीनचे एक रॉकेट पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरामध्ये पडले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडण्याची शक्यता आहे.

रॉकेटची 7 किमी प्रतिसेकंदची स्पीड

पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे आहे. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत आहे. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीच्या 170 ते 372 किलोमीटरच्या उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रॉकेटची रुंदी 16 फूट असून चीनने त्याला 28 एप्रिल रोजी अंतराळात सोडले होते.

या देशांना धोका

हे रॉकेट कधीही पृथ्वीवर आदळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ त्यावर नजर ठेवून आहेत. त्याची गती आणि ते नेमके कोठे पडू शकते, याचा अंदाज हे शास्त्रज्ञ लावत आहेत. दरम्यान हे रॉकेट पृथ्वीभोवती फिरत असताना आपली गती सारखे बदलत आहे. त्यामुळे रॉकेट पृथ्वीवर नेमके कोठे पडेल याचा अंदाज लावणे शास्त्रज्ञांना मुश्किल होऊन बसले आहे. सध्या रॉकेटचा जो मार्ग आहे, त्यानुसार हे रॉकेट आगामी काळात पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात म्हणजेच न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग या शहरांच्या आसपास पडू शकते. तसेच दक्षिण गोलार्धातील चिले आणि न्यूझिलंडची राजधानी वेलिंग्टन या शहराच्या आसपाससुद्धा हे रॉकेट पडू शकते.

दरम्यान, हे रॉकेट पृथ्वीवर पडलेच तर पृथ्वीवर पडताना त्याचा नेमका किती हिस्सा पृथ्वीवर पडू शकतो, याचा अंदाज बांधला जातोय.  युरोपीयन स्पेस एजन्सीने सांगितल्यानुसार 17800 किलो वजन असेलेल्या रॉकेटचा पृथ्वीवर पडताना  फक्त 20 ते 40 टक्के पडू शकतो. बाकीचा जळून नष्ट होतो. त्यामुळे आगामी काळात या रॉकेटचे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या :

Bill Melinda Gates divorce : बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट, कारण काय?

(Chinese rocket got out of control while returning to earth may fall back to earth)