AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपकेंपासून प्रेरणा… पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, सरकारपासून आर्मीपर्यंतचं टेन्शन वाढलं

भारतातच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) नंतर आता पाकिस्तानही त्याची ख्याती पसरली असून तिथेही कॉक्रॉच पार्टी समोर आली आहे. सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय झालेल्या या समूहाचे इन्स्टाग्रामवर 1 लाखापेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. तरूणाई आणि सामान्य नागरिकांचा आम्ही आवाज आहोत, असं या गटातर्फे सांगण्यात येत आहे.

अभिजीत दीपकेंपासून प्रेरणा... पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, सरकारपासून आर्मीपर्यंतचं टेन्शन वाढलं
आता पाकिस्तानातही कॉक्रोच पार्टी
| Updated on: Jul 31, 2026 | 1:06 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून भारतात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ची प्रचंड चर्चा आहे. तरूणाईचा आवाज बनून दिल्लीत केलेलं आंदोलनही प्रचंड गाजलं. सीजेपीचे फाऊंडर अभिजीत दीपकेही सध्या सर्व्तर गाजत असून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या नावाची दखल घेतली गेली. याच अभिजीत दीपकेपासून प्रेरणा घेऊन आता भारताचा शेजारील देश, पाकिस्तानमध्येही एका नव्या ऑनलाइन राजकीय गटाची चर्चा सुरू झाली आहे.‘कॉकरोच पार्टी पाकिस्तान’ (CPP) या नावाने सुरू झालेल्या या डिजिटल मंचाने सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत असून इंस्टाग्रामवर या गटाचे 1 लाख 12 2हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. हा गटाने स्वतःला भ्रष्टाचार, घराणेशाही आणि विशेषाधिकारांवर आधारित राजकारणाविरोधात तरुणांचा आवाज म्हणून सादर केलं आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सलमान तरार यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ते सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहेत. इंस्टाग्राम वरून मिळालेल्या माहितीनुसार, हे अकाउंट मे महिन्यात तयार करण्यात आले असून ते कॅनडामधून चालवले जात असल्याचं सांगितल जात आहे. एवढंच नव्हे तर, याच महिन्यात या अकाउंटला व्हेरिफिकेशनही मिळाले आहे.

CPP च्या अजेंड्यावर कोणते मुद्दे?

CPP अर्थात कॉकरोच पार्टी पाकिस्तानने देशात पारदर्शक प्रशासन आणि चांगली शासनव्यवस्था निर्माण करण्याचा दावा केला आहे. पक्षाने मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :

– भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई

– घराणेशाही आणि विशेषाधिकारांच्या राजकारणाला विरोध

– रोजगाराच्या संधी वाढवणे

– शिक्षण व्यवस्थेत सुधारणा

– ऊर्जा संकटावर उपाययोजना

– पाणीटंचाईवर तोडगा

– आर्थिक आणि राजकीय स्थैर्य निर्माण करणे

पाकिस्तान हा भ्रष्ट माफियांचा नाही, तर सामान्य नागरिकांचा देश आहे, असा या गटाने दावा केला आहे. विशेषतः तरुण आणि सामान्य लोकांच्या समस्या मांडण्यासाठी हे एक आंदोलन असल्याचं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर वाढता प्रभाव

कॉकरोच पार्टी पाकिस्तान (CPP) सोशल मीडियावर सातत्याने ॲक्टिव्ह दिसत आहे. त्यांच्या पोस्टमध्ये पाकव्याप्त जम्मू-कश्मीर (PoK) मधील परिस्थिती आणि तेथील लोकांच्या प्रश्नांचाही उल्लेख केला जातो. अलीकडेच या गटाने संघटनेतील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाकिस्तानमध्ये राजकीय सक्रियतेचे आव्हान

भारतामध्ये जेव्हा CJPचं आंदोलन, त्यांचं प्रदर्शन सुरू होतं, तेव्हा पाकिस्तानमधूनही तरूणांच्या अनेक रिॲक्शन येत होत्या. भारतामध्ये CJP सारख्या व्यंगात्मक किंवा पर्यायी राजकीय मोहिमांना लोकशाही वातावरणामुळे व्यासपीठ मिळतं, अशी प्रतिक्रिया काही पाकिस्तानी तरुणांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. मात्र पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा राजकीय विरोध करणे अधिक जोखमीचे ठरू शकते, असंही मत काहींनी मांडलं होतं.

मात्र सोशल मीडियावर वाढती लोकप्रियता असूनही कॉकरोच पार्टी पाकिस्तानला प्रत्यक्षात किती जनाधार मिळेल किंवा हा गट भविष्यात औपचारिक राजकीय शक्ती म्हणून उभा राहू शकेल का, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही.

Follow Us
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना