AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Bathe: शेतकर्‍याच्या लेकीचा मोठा डंका, वैष्णवी गणेश बाठे बनली पुणे मेट्रोची सारथी

Vaishnavi Ganesh Bathe Metro train driver: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन केले. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची सेवा पुणेकरांना दिलासा देणारी ठरली. त्याचवेळी शेतकऱ्याच्या लेकीचे मोठा डंका वाजला. वैष्णवी गणेश बाठे बनली पुणे मेट्रोची सारथी बनली.

Vaishnavi Bathe: शेतकर्‍याच्या लेकीचा मोठा डंका, वैष्णवी गणेश बाठे बनली पुणे मेट्रोची सारथी
शेतकर्‍याच्या लेकीचा मोठा डंका, वैष्णवी गणेश बाठे बनली पुणे मेट्रोची सारथी
| Updated on: Nov 04, 2026 | 11:29 AM
Share

Metro train driver Vaishnavi Ganesh Bathe: पुण्यातील IT हबला आता चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन केले. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची सेवा पुणेकरांना दिलासा देणारी ठरली. आजपासून ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. त्याचवेळी पुणेकरांची मान ताठ करणारी बातमीही समोर आली आहे. पुणे मेट्रोचे सारथ्य भोर तालुक्यातील शेतकरी कन्येच्या हाती आले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी ही पिंक मेट्रो असल्याचे सांगितले होते. यामध्ये 50 टक्के कर्मचारी या महिला आहेत.

केंजळ गावच्या लेकीच्या हाथी मेट्रोचे सारथ्य

पुण्याच्या भोर तालुक्यातील केंजळ गावची लेक वैष्णवी गणेश बाठे मेट्रोची सारथी बनली आहे. वैष्णवीला काल नव्याने उदघाट्न झालेल्या हिंजवडी मार्गावरील पिंक मेट्रोचे सारथ्य करण्याची संधी मिळाली. वैष्णवीचे वडील गणेश बाठे एक शेतकरी आहेत. प्रतिकूल परिस्थिती मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण करून तिने इथंपर्यंत झेप घेतली आहे. इंजिनिअरिंगच शिक्षण सुरु असतानाच तिची प्लेसमेंट झाली. सहा महिने ट्रेनिंग घेऊन तिच्या सोबत अनेक मुली आज मेट्रो चालक बनल्या आहेत. ‘बेटीया किसीसे कम नहीं है’ या मुलीने आज सिद्ध करून दाखवून दिले. तिच्या या कामगिरी मुळे कुटुंबातील सर्वांना आनंद झाला असून..महिला सक्षमिकरणच्या धरतीवर केंजळ गावातून तसेच पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे..

जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर

वैष्णवी बाठे हिने जिद्द, चिकाटीच्या जोरावर भोर तालुक्यातील यशाचे नवीन शिखर गाठले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण सुरू असतानाच तिला मेट्रोत नोकरीची संधी मिळाली. गेल्या सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण तिने पूर्ण केले. ती आता मेट्रोची सारथी, मेट्रो चालक (Metro Driver) झाली आहे. तिच्यासोबत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक मुलीही आज मेट्रो चालक म्हणून कार्यरत आहेत. तिच्या या यशामुळे बाठे कुटुंबियांसह केंजळ गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. वैष्णवी बाठे या किओलिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ट्रेन पायलट, मेट्रो ऑपरेटरन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुणे मेट्रोच्या विविध चाचण्या आणि ट्रेन ड्रायव्हिंगचे काम सांभाळले आहे.

महिला सक्षमीकरणाचा नारा

पुणे मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२ किलोमीटर लांबीच्या पिंक मेट्रो मार्गिका ३ चे लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिले तिकीट काढून या मेट्रोतून प्रवास केला. या मार्गिकेवर एकूण २३ स्थानकं आहेत. या पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे आहे. लीड ट्रेन पायलट या प्रगती बिरादार आहेत. यामध्ये ९० महिला चालक आणि एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के महिला कर्मचारी आहेत.

Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...