AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRPF जवानाचे पाकिस्तानी मुलीशी प्रेम जुळले, अनोख्या पद्धतीने केला विवाह, बॉर्डर ओलांडून आली खरी, मग जे झाले ते….

जम्मू - कश्मीर सतत गोळीबाराच्या आवाजाने दहशतीखाली असतो. अशा दहशतीत शनिवारी एक पाकिस्तानी सून आपल्या भारतातील पतीच्या घरी वाजत गाजत पोहचली. पाकिस्तानी तरुणीचे एका सीआरपीएफच्या जवानाशी प्रेम जुळले होते. शनिवारी अखेर तिने बॉर्डरवर प्रवेश केला...

CRPF जवानाचे पाकिस्तानी मुलीशी प्रेम जुळले, अनोख्या पद्धतीने केला विवाह, बॉर्डर ओलांडून आली खरी, मग जे झाले ते....
CRPF Jawan Marry Pakistani Girl
| Updated on: Mar 03, 2025 | 5:28 PM
Share

सीमा हैदर आणि सचिन यांची अनोखी सीमापार प्रेम स्टोरी तुम्ही वाचली असेलच..आता आणखी एका लग्नाची चर्चा अख्ख्या जम्मू-कश्मीरमध्ये होत आहे. केद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या ( सीआरपीएफ ) जवानाचे एका पाकिस्तानी मुलीशी प्रेम जडले. त्यानंतर या तरुणाने तिच्याशी कोणीही विचार केला नसेल अशा पद्धतीने विवाह केला. त्यानंतर बॉर्डर ओलांडून ही तरुणी पतीच्या घरी म्हणजे सासरी आली. त्यानंतर सर्व गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत….

जम्मू- कश्मीरात एका लग्नाची खूप चर्चा होत आहे. एका सीआरपीएफच्या जवानाने पाकिस्तानी मुलीशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याची पत्नी बॉर्डर क्रॉस करुन पतीला भेटायला जम्मूच्या त्याच्या गावी भलवाल येथे पोहचली.या लग्नाची चर्चा साऱ्या गावात होत आहे. कारण मुनीर अहमद सध्या निवासी जिल्ह्यातील शिव खोरीतील सीआरपीएफमध्ये तैनात आहे. तर त्यामुळे सुरक्षा यंत्रणाने तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष्य ठेवायला सुरुवात केली आहे.

जम्मूच्या भलवालचा रहीवासी असलेला सीआरपीएफचा जवान मुनीर अहमद याने पाकिस्तानच्या मनेल खान हीच्याशी निकाह केला आहे. मनेल पाकिस्तानच्या हद्दीतील पंजाब क्षेत्राची रहिवासी आहे. मनेल पाकिस्तानच्या पंजाबातील सियालकोटच्या गुजरांवालाच्या कोटली फकीर चंद यांच्या मोहम्मद असगर खान यांची मुलगी आहे. या जोडप्याने गेल्यावर्षी २४ मे रोजी निकाह केलाय, व्हीसा न मिळाल्याने निकाहला उशीर झाल्याने या जोडप्याने अनोख्या पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने निकाह केला होता.

१५ दिवसांच्या व्हीसावर भारतात आली

आता अधिकृतपणे लग्न केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी मनेल भारताच्या मुनीरची पत्नी बनली आहे. लग्नानंतर जेव्हा तिला १५ दिवसांचा व्हीसा मिळाला तेव्हा अटारी-वाघा बॉर्डरच्या मार्गाने आपल्या पतीला भेटण्यासाठी जम्मूला पोहचली. रात्री उशीरा जसी मनेल बॉर्डर पार करुन भारतात पोहचली तेव्हा पलीकडे भारताच्या सीमेवर तिचे सासरची मंडळी तिची वाट पाहात उभी होती. बॉर्डरवरच नव्या सुनेचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि तिला सासरी आणण्यात आले. गावात जशी ही बातमी जशी गावात पोहचली तशी पाकिस्तानी सूनेला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.