न गोळीबार केला, न मिसाईल डागली, चीनला त्याच्या सर्वात छोट्या शत्रूनं मुळापासून हादरवलं
चीनने पाक, श्रीलंका, बांगलादेश यांनाही कर्ज देण्याच्या बदल्यात आपले उखळ पाढंरे करुन घेतले आहे. त्यातच आता चीनला एका छोट्याशा देशाने त्रासात टाकले आहे.

चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षा आणि विस्तारवादाने जगाला टेन्शन आलेले आहे. दुसरी आर्थिक महासत्ता असलेल्या चीन सध्या दक्षिण आशियात भारताही डोकेदुखी ठरला आहे. अशात एका छोट्याशा देशाने चीनची हवा टाईट केलेली आहे. चीनी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की तैवानचा सत्ताधारी पक्ष DPP वर मोठा सनसनाटी आरोप केला आहे.चीनने त्यांच्या गुआंगझोउ शहरावर सायबर हल्ला केल्याचा आरोप तैवानच्या सत्ताधारी पक्ष DPP वर केला आहे.
चीनने पाकिस्तानला सढळ हस्ते 4.5 पिढीचे फायटर जेट दिले आहे. सध्या चीन आणि पाकिस्तान यांच्याकडेच 4.5 व्या पिढीचे फायटर जेट आहे. त्यामुळे चीनने पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनाही कर्ज देण्याच्या बदल्यात आपले उखळ पाढंरे करुन घेतले आहे. त्यातच आता चीनला एका छोट्याशा देशाने त्रास दिला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे परदेशी हँकर्स संघटनेला तैवानची डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीचे ( DPP ) समर्थन असल्याचा आरोप गुआंगडोंग प्रांताच्या राजधानीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. DPP तैवानची सत्तारुढ पक्ष आहे.चीनचे अधिकारी या सायबर हल्ल्याला थेट तैवानची राजकीय पार्टीची फूस असल्याचे म्हणत आहेत.
चीन तैवान वाद?
चीन आणि तैवान वादाला बऱ्याच वर्षांचा इतिहास आहे.परंतू तैवानने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषीत केलेले आहे. तैवान अलिकडच्या काळात चीनपासून स्वतंत्र होण्यासाठी लढत आहे. चीन तैवानला आपला हिस्सा मानत आहे.चीनला धाकात ठेवण्यासाठी चीनने हरप्रकारे प्रयत्न करीत आहे. चीन तैवानच्या सीमेवर जाऊन युद्ध अभ्यास करीत आहे. तसे पाहिले तर तैवान बेटाला चीन नियंत्रित करतो. आणि पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना या क्षेत्रास त्यांचे असल्याचे म्हणत आहे. तसे पाहीले तर तैवानला अमेरिका आणि इतर देश आर्थिक आणि लष्करी मदत करत आहेत.
आरोपावर तैवानची प्रतिक्रिया
चीनमध्ये हँकींग केल्या प्रकरणात तैवानवर आरोप झाल्यानंतर मेनलँड अफेअर्स काऊन्सिलने या संदर्भात विचारणा केली आहे. परंतू अजूनही तैवानने यावर काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग – ते गेल्या वर्षी सत्तेवर आल्यानंतर चीनविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या वक्तव्यांनी चीन आणि तैवान यांच्या तणाव वाढला आहे. अमेरिका या प्रकरणात उघडपणे चीनच्या विरोधात आहे. तर भारताने या वादात अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे.
