AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona नव्या व्हेरिएंटने चिंता वाढली, अमेरिकेत एका आठवड्यातच इतके मृत्यू

जगभरात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतातही हा आकडा वाढत आहे. परंतू कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट बाबत अजूनही संशोधन सुरुच आहे. हा आजार नेमका कितपत घातक आहे याबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांनी भाष्य केले आहे.

Corona नव्या व्हेरिएंटने चिंता वाढली, अमेरिकेत एका आठवड्यातच इतके मृत्यू
महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्ली हे राज्य कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन या व्हेरिएंटचे चार उपप्रकार सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे.
| Updated on: May 27, 2025 | 3:41 PM
Share

कोरोना व्हायरसने पुन्हा डोकेवर काढले आहे. भारतापासून थायलंड, हाँगकाँग ते सिंगापूरात कोरोनाचे केस वाढतायत…परंतू अमेरिकेत कोरोनाच्या मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. अमेरिक शेकडो लोकांचा मृत्यू नव्या कोरोनाने झाला आहे. म्हणजे कोरोना संपूर्णपणे गेला नव्हता त्याचे म्युटेशन येतच आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंटने अमेरिकेत आतापर्यंत साडे तीनशे लोकांचे मृत्यू झाले आहेत. भारताच्या अनेक भागात कोरोनाचे पेशंट वाढले आहेत. थायलंडमध्ये अमेरिकेसारखीच स्थिती आहे. परंतू जेथून कोरोनाची साथ सुरु झाली होती. त्या चीनमध्ये मात्र नेमकी काय स्थिती आहे. याचा उलगडा झालेला नाही.

देशभरात कोरोनाचे एका आठवड्यात एक हजाराहून अधिक रुग्ण झाले आहेत. कोरोनाचे केवळ आकडेच वाढलेले नाहीत तर कोरोनाने आतापर्यंत ७ जणांना मृत्यू झाला आहे.पण हे स्पष्ट झाले आहे की त्यांच्या मृत्यूचे कारण नक्की कोरोना होते की अन्य कोणता आजार हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने नंतर थायलंडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. थायलंड येथे एकाच आठवड्यात ५० हून अधिक केसेस आल्या आहेत.

अमेरिकेत एका आठवड्यात ३५० मृत्यू, नव्या व्हेरिएंटने चिंता वाढली

अमेरिकेत कोरोना आता जीवघातक बनला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेत ३५० जणांचा मृ्त्यू झाला आहे. ही संख्या जरी आधीच्या लाटेप्रमाणे जादा नसली तरी याने चिंता वाढत आहे.नवीन व्हेरिएंट NB.1.8.1 अमेरिकेसह आशिया, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये पसरला आहे. संशोधकांच्या मते व्हेरिएंट वेगाने पसरतो मात्र याच्या गंभीरतेबाबत अजूनही संशोधन सुरु आहे.

व्हॅक्सीनचे डोस न घेणे आणि कमजोर इम्युनिटीने धोका

अमेरिकेत केवळ २३ टक्के वयस्कांनीच अपडेटेड व्हॅक्सीन घेतली होती. मुलांमध्ये तर केवळ १३ टक्क्यांनी व्हॅक्सीन घेतली होती. व्हॅक्सीन न घेणे आणि कमजोर इम्युनिटी देखील यास कारणीभूत आहे. दोन्हींमुळे हा स्पाईक दिसत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजारी लोकांमध्ये हा व्हायरसचा परिणाम जास्त आहे. त्यामुळे ६५ वर्षांवरील लोकांनी दर सहा महिन्यांनी ही व्हॅक्सीन घ्यायला हवी असा सल्ला दिला जात आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.