Cyclone Kyle : 18 तासात मोठा हाहा:कार, अनेक शहरं बुडणार, रविवारी धडकणार अक्राळविक्राळ ‘काइल’ वादळ

अटलांटिक महासागरातून येणारे अक्राळविक्राळ 'काइल' वादळ अमेरिका आणि कॅनडाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या वादळामुळे सलग 18 तास मुसळधार पाऊस आणि 145 किमी/तास वेगाने वारे वाहतील. अनेक शहरांमध्ये महापूर येण्याची शक्यता असून, सखोल भागात कमरेपर्यंत पाणी भरेल, असा धोका व्यक्त केला जात आहे.

Cyclone Kyle : 18 तासात मोठा हाहा:कार, अनेक शहरं बुडणार, रविवारी धडकणार अक्राळविक्राळ काइल वादळ
Cyclone Kyle
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 5:05 PM

अकवान वादळाच्या संकटानंतर आता नव्या वादळाची धडक बसणार आहे. सर्वात खतरनाक असलेल्या ‘काइल’ वादळाचं संकट डोक्यावर आलं आहे. येत्या काही तासातच हे वादळ धडकणार असून त्यामुळे मोठा हाहा:कार उडणार आहे. हवामान खात्याने याबाबतचा इशारा दिला आहे. या वादळामुळे 18 तास सलग पाऊस पडणार आहे. त्यातच ताशी 145 किलोमीटर वेगाने जीवघेणे वारे वाहणार आहेत. त्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त होणार आहे. काही भागात 20 इंच पाऊस पडणार आहे. याचा अर्थ सखोल भागात कमरेपर्यंत पाणी भरणार आहे. अनेक शहरे बुडणार असून ड्रेनेज सिस्टिम ठप्प होणार आहे. या अक्राळविक्राळ वादळामुळे शेती पाण्याखाली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिका आणि कॅनडाच्या किनारपट्टी भागात हे वादळ धडकणार आहे. अटलांटिका महासागरात एक सिस्टिम तयार होत आहे. त्यामुळे संकट वाढलं आहे. एक्यूवेदरच्या हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बहामासच्या उत्तरेच्या वर आणि मध्य फ्लोरिडाच्या अटलांटिका किनारपट्टीच्या पूर्वेला ही सिस्टिम तयार झाली आहे. या हवेचा दाब अधिक वाढून मजबूत झाला तर वादळ येणार आहे. या वादळाला काइल (Kyle) हे अधिकृत नाव देण्यात येणार आहे. हे वादळ किनारपट्टीवरून वळणदार मार्गाने उत्तरेकडे सरकेल, अशी माहिती या हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे.

Loading...

सोमवारी रात्रीच…

हवेचं स्वरुप बदलल्यानंतर हे वादळ जमिनीच्या अत्यंत जवळ येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी किनारपट्टीला थेट धडकणार आहे. रविवारी अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना आणि सोमवारी रात्री वा मंगळवारपर्यंत कॅनडाच्या नोव्हा स्कोटिया किनारपट्टीवर हे वादळ धडकून मोठं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.

किती धोकादायक?

हवामान शास्त्रज्ञांनी या वादळामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाजा घेऊन याला ‘ट्रॉपिकल विंड आणि रेनस्टॉर्म’ नाव दिलं आह. याला रिअलइम्पॅक्ट स्केलवर स्तर एकवर ठेवलं आहे. याने केवळ हवेचा स्पीडच मोजला जात नाही तर पाऊस, पूर, समुद्रात उसळणाऱ्या लाटा आणि सामान्य नागरिकांना किती आर्थिक नुकसान होईल, जीवित हानी किती होऊ शकेल याचाही हिशोब ठेवला जाणार आहे.

कोणत्या राज्यात वादळी पाऊस?

या वादळाच्या केंद्राच्या पश्चिम भागात पाऊस आणि प्रचंड वारे वाहणार आहे. पण सर्वाधिक कहर त्याच्या केंद्राच्या आसपास आणि पूर्व भागात पाहायला मिळणार आहे. या विकेंडला अमेरिकेच्या दक्षिण पूर्व राज्यात हवामान अधिक खराब होईल. साऊथ कॅरोलिनाच्या किनारपट्टी भागात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम मध्य नॉर्थ कॅरोलिना, दक्षिण पूर्व व्हर्जिनिया, डेलमार्वा आणि न्यू जर्सीच्या किनारपट्टीवर होणार आहे. तर नॉर्थ कॅरोलिनाच्या आऊट बॅक्स परिसरात हवेचा स्पीड ताशी 129 प्रति किलोमीटर जाण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us