दाऊद इब्राहिमच्या 38 वर्षीय पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू

| Updated on: Dec 25, 2020 | 12:12 PM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दाऊद इब्राहिमच्या 38 वर्षीय पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us on

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील कराचीमधल्या रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दाऊदचा पुतण्या सिराज कासकर (Siraj Kaskar) याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर कराचीमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान सिराज कासकरचा मृत्यू झाला.  (Dawood Ibrahim nephew Siraj Kaskar died due to coronavirus at karachi)

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारतीय सुरक्षा एजन्सींना मिळणाऱ्या कराचीतील कॉल्सच्या अपडेटवरुन ही माहिती समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.

दाऊदचा मोठा भाऊ साबिर कासरकरचा मुलगा सिराजला कोरोनाचा संसर्ग झाला होता. 38 वर्षीय सिराजला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तो कोरोनातून बरा होऊ शकला नाही.

पाकिस्तानात कोरोनाची दुसरी लाट

पाकिस्तानात कोरोनाने (Pakistan Corona update) अक्षरश: हैदोस घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेकांचे जीव जात आहेत. त्यातच पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचारापासून वंचित राहावं लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यातच थंडी आणि प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली.

दाऊद इब्राहिम कोण?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

 दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो.  भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्या डोक्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.

(Dawood Ibrahim nephew Siraj Kaskar died due to coronavirus at karachi)

संबंधित बातम्या  

Chhota Shakeel | छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचाही मृत्यू, महिनाभरात दोन्ही बहिणी ‘कोरोना’ बळी

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी