पाकिस्तानला दणका, तुर्कीने सोडली साथ, पळता भुई कमी, भारताबद्दल थेट..
तुर्की, पाकिस्तान आणि साैदी अरेबिया यांनी मिळून मोठा संरक्षण करार केला. मात्र, हा संरक्षण करार होऊन काही वेळ होत नाही, तोवरच या कराराची हवा निघाली. भारताच्या विरोधात पाऊस उचलणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला.

पाकिस्तानची इतकी जास्त घाबरगुंडी उडाली आहे की, पाकिस्तानला चांगल्याप्रकारे समजले आहे, भारताविरोधात आपण एकटे कधीच लढू शकत नाहीत. यामुळे पाकिस्तान मागील काही दिवसांपासून या देशासोबत त्या देशासोबत संरक्षण करार करण्यावर भर देत आहे. पाकिस्तानने तुर्की, साैदी अरेबिया यांच्यासोबत संरक्षण करार केला. एका देशावर हल्ला म्हणजे या तीन देशांवर समजला जाणार आहे. या संरक्षण करारानंतर अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलीत. भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानने हा संरक्षण करार घडवून आणला. मात्र, आता करार होऊन काही वेळच होत नाही, तोपर्यंत मोठा धक्का बसला. तुर्कीच्या विदेश मंत्र्यांनी स्पष्ट केले की, साैदी अरेबिया, पाकिस्तान आणि आमच्यात झालेला संरक्षण करार इराण किंवा कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे.
पाकिस्तान भारताविरोधात तीन देश एकत्र आल्याचे दाखवत होता. तुर्कीनेच कोणत्याही देशाविरोधात हा करार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी हा करार महत्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मात्र, यादरम्यान त्यांनी म्हटले की, कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर तो या तीन देशांवर सजमला जाईल. मक्का संयुक्त रक्षा करार असे या कराराला नाव देण्यात आले.
इस्लामिक नाटोसाठी पाकिस्तान खूप जास्त आग्रही होता. अखेर तुर्की आणि साैदी अरेबियाने यांना साथ दिली. हा संरक्षण म्हणजे पाकिस्तानला खूप जास्त मोठा विजय वाटत आहे. पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी आणखीन दोन देश मिळाली आहेत. मात्र, ज्यावेळी समोरासमोर विषय येईल, त्यावेळी एकही देश भारताच्या पुढे उभा राहणार नसल्याचे स्पष्ट आहे.
तुर्की आणि भारत यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये संबंध बिघडली आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताची लष्करी ताकद समजली आहे. त्यानंतर पाकिस्तान अशाप्रकारेच करार करत आहे. पाकिस्तानची पार वाट लागली आहे. युएईने पाकिस्तानला दिलेले कर्ज परत मागितले आहेत. काही दिवसांचा कालावधी हे कर्ज परत करण्यासाठी दिला. पाकिस्तानची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे.