AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारीही बँका सुरूच राहणार, सरकारने घेतला तातडीने निर्णय, मोठं कारण समोर

सर्वसामान्यपणे बँकांना रविवारी आठवडी सुट्टी असते. परंतु या आठवड्यात मात्र असं घडणार नाहीये, 27 सप्टेंबर रोजी रविवारी देखील बँका सुरूच राहणार आहेत. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

रविवारीही बँका सुरूच राहणार, सरकारने घेतला तातडीने निर्णय, मोठं कारण समोर
बँक रविवारी देखील सुरूच राहणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 2:49 PM
Share

सर्वसामान्यपणे बँकांना रविवारी आठवडी सुट्टी असते. परंतु या आठवड्यात मात्र असं घडणार नाहीये, 27 सप्टेंबर रोजी रविवारी देखील बँका सुरूच राहणार आहेत. सरकारने या आठवड्यात रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बँकांच्या वतीने 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ शकते, ती टाळण्यासाठी आता सरकारने येत्या रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सर्व राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच ग्रामीण बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. बँक कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बाबत माहिती देताना अर्थमंत्रालयाने म्हटलं की, युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंस (UFBU) कडून येत्या 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सरकारने रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

संपावर तोडगा नाहीच

आपल्या विविध मागण्याच्या पार्श्वभूमीवर युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंसच्या वतीने तीन दिवसांच्या संपाचा इशारा देण्यात आला आहे. बँकिंग कामकाजाचा आठवडा हा पाच दिवसांचा करावा ही त्यांची मुख्य मागणी आहे. या संदर्भात सरकारची युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंससोबत बैठक पार पडली, परंतु या बैठकीमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाहीये. सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत काही निर्णय घेतला तर आम्ही संप मागे घेऊ असं देखील युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंसने म्हटलं आहे. परंतु तोडगा निघू शकला नसल्याने आता तीन दिवसांच्या संपाची शक्यता आहे. त्यामुळे आता रविवारी देखील बँका सुरूच राहणार आहे. तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांनी त्या आधीच आपली कामं उरकून घ्यावीत.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?