AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA: रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा… अमेरिकेची भारताला धमकी

कच्च्या तेलाच्या खरेदीवरून आता अमेरिकेने भारतासह काही देशांना उघड धमकी दिली आहे. अमेरिकेने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

IND vs USA: रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा... अमेरिकेची भारताला धमकी
ind vs usa
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 22, 2025 | 7:08 PM
Share

जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. याचा कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम होते आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीवरून आता अमेरिकेने भारतासह काही देशांना उघड धमकी दिली आहे. भारत, चीन आणि ब्राझीलने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद केले नाही तर तुमच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान सहन करावे लागेल असं अमेरिकेने म्हटलं आहे.

तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर…

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी एका मुलाखतीत इशारा देताना म्हटले की, जर तुम्ही रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून युक्रेनविरुद्धच्या युद्धाला खतपाणी घालत राहिलात तर आम्ही तुमची अर्थव्यवस्था नष्ट करू. हे देश रशियाकडून तेल खरेदी करून, स्वतःचा फायदा पाहत आहेत आणि रशियालाही पाठिंबा देत आहेत. कारण भारत, चीन आणि ब्राझील हे तीन देश रशियाचे सुमारे 80 % तेल खरेदी करत आहेत, त्यामुळे रशियाला चांगला आर्थिक फायदा होत आहे.

500% टॅरिफ लावण्याची योजना

लिंडसे ग्राहम आणि रिचर्ड ब्लूमेंथल यांनी संसदेत एक विधेयक सादर केले आहे, ज्यात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% पर्यंत टॅरिफ लादण्याची तरतूद आहे. याचा अर्थ भारत, चीन किंवा ब्राझील रशियाकडून तेल खरेदी करत राहिले तर या देशांच्या वस्तूंवर 500 टक्के कर लावला जाईल, ज्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल.

ग्राहम यांच्या मते, या विधेयकामुळे केवळ रशियालाच नव्हे तर त्याच्यासोबत व्यापार करणाऱ्या देशांनाही धडा शिकवेल. आतापर्यंत या विधेयकाला 85 खासदारांनी पाठिंबा दिसा असल्याचेही समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक भूमिका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशियासह इतर देशांना इशारा दिला आहे. जर रशियाने पुढील 50 दिवसांत युक्रेनसोबत युंद्धबंदीचा निर्णय घेतला नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 % टॅरिफ (आयात कर) लादण्याचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताने दिले उत्तर

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताने बोलणी सुरु केली आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, ‘भारत रशियाकडून आपल्या गरजा लक्षात घेऊन तेल खरेदी करत आहे. भारतीय दूतावास आणि राजदूतांनी ग्राहम यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. आम्ही आमच्या समस्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. यापुढेही आम्ही या मुद्द्यावर चर्चा करु.’

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट