
US-India Tension : अमेरिकेने भारताला जणू शत्रू राष्ट्रच मानलं आहे. ट्रम्प यांची आक्रास्तळेपणाची भूमिका जगासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात भारतावर ट्रम्पचा दात आहे. भारत रशियाकडून इंधन खरेदी थांबवत नसल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे. त्यातच त्यांनी युरोपियन संघावर मोठा दबाव टाकला आहे. भारताकडून तेल व इतर साहित्य खरेदी तात्काळ थांबवावी असा दबाव व्हाईट हाऊसने टाकला आहे. भारतावर अमेरिकेने जसे निर्बंध लादले आहेत, तसाच टॅरिफ युरोपियन संघाने भारतावर लावण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. त्यामुळे पाकड्यांपेक्षा ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरू असल्याचे दिसून येत आहे.
रशियाला भारताकडून आर्थिक रसद
भारत रशियाकडून कच्चे इंधन खरेदी करत असल्याने मॉस्कोचे हात मजबूत होत आहेत. भारताकडून रशियाला आर्थिक रसद मिळत असल्यानेच युद्ध थांबत नसल्याचे खापर ट्रम्प यांनी फोडले आहे. वॉशिंग्टनने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यातच अमेरिकेने आता युरोपियन राष्ट्रांकडे मोर्चा वळवला आहे. चीन, भारतच नाही तर युरोपातील अनेक देश भारताच्या मदतीने रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी तात्काळ ही तेल खरेदी थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. युरोपने गॅस आणि तेलाची खरेदी थांबवावी असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
युरोपचे मौन, ट्रम्प यांचा संताप
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अनेक युरोपियन नेते सार्वजनिकरित्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध विरामाच्या मागणीला समर्थन देत आहेत. पण गुपचुपपणे हीच नेते मंडळी अलास्का येथे ट्रम्प-पुतिन चर्चेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा वाशिंग्टनने केला आहे. युरोपवर ट्रम्प यांनी आगपाखड केली आहे. तर भारताकडून गॅस आणि तेल खरेदी थांबवण्यासाठी मोठा दबाव टाकला आहे. दरम्यान आज चीनसोबत खंडित झालेला संवाद सुरू होत आहे. चीन आणि भारताची ही जवळीक ट्रम्प यांना झोंबणारी आहे.