India-America Tension : भारत-रशिया जवळ येताच अमेरिकेचा थयथयाट, ट्रम्प यांच्या मंत्र्याचं भारतविरोधी वक्तव्य

India-America Tension : अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका संबंधात नव्याने तणाव वाढला आहे. ते थेट भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला आव्हान देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतातयीपणामुळे आधीच भारतात नाराजी आहे. आता त्यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने आणखी तणाव वाढवणारं वक्तव्य केलं आहे.

India-America Tension : भारत-रशिया जवळ येताच अमेरिकेचा थयथयाट, ट्रम्प यांच्या मंत्र्याचं भारतविरोधी वक्तव्य
Trump-Putin-Modi
| Updated on: Jun 03, 2025 | 1:45 PM

भारत अमेरिकेला आपला मित्र मानतो. पण आता त्यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. भारताबद्दलच अमेरिकेच खरं रुप त्यांचे अधिकारीच समोर आणत आहेत. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताबद्दल हैराण करणारं वक्तव्य केलं आहे. रशियाकडून भारताची शस्त्रास्त्र खरेदी आणि भारताने ब्रिक्स देशांच सदस्य असणं यावर मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी आक्षेप नोंदवला आहे. भारताने नेहमीच अमेरिका आणि रशिया सोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कुठल्याही दबावाशिवाय आपलं हित साधलं आहे. आता हीच गोष्ट अमेरिकेला खुपू लागली आहे. रशियाकडून भारताची शस्त्रास्त्र खरेदी अमेरिकेच्या नाराजीच कारण आहे. मागच्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत आहे.

वॉशिंग्टन डीसी येथे एका इंटरव्यूमध्ये अमेरिकी वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, “भारत सरकारने अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्याचा सामान्यपणे अमेरिकेवर वाईट परिणाम होतो” लुटनिक उदहारण देताना म्हणाले की, “तुम्ही रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करत असाल, तर अमेरिकेला त्रास देण्याची ही एक पद्धत आहे तसचं ब्रिक्स समूहातील देशांना डॉलरच वर्चस्व मान्य नाही”

अमेरिकेला काय मान्य नाही?

अमेरिका रशियाला आपलं शत्रू मानतो. त्याशिवाय अमेरिकेने रशियावर अनेक प्रतिबंध लादले आहेत. भारताची रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी आणि ब्रिक्सच सदस्य असणं रशियाची ताकद वाढवतं. ही गोष्ट अमेरिकेला मान्य नाहीय.

अमेरिकेच्या विरोधाला जुमानलं, तर त्यात भारताच जास्त नुकसान

अमेरिकेने रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेणाऱ्या देशांवर प्रतिबंध लादले आहेत. पण भारताने रशियाकडून ही सिस्टिम विकत घेतली. भारतावर अमेरिकेने असे कुठलेही प्रतिबंध लादलेले नाहीत. रशियाच्या याच S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तान विरुद्धच्या चार दिवसाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अमेरिकेच्या विरोधाला जुमानलं, तर त्यात भारताच जास्त नुकसान आहे.


ट्रम्प यांचा अतातयीपणा

सध्या डोनाल्ड ट्रम्प अशा भूमिका घेत आहेत, त्यामुळे जगात अनेक देशांसोबत अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीच्यावेळी सुद्धा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असाच अतातयीपणा केला. त्यांनी X वर पोस्ट करुन शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यांना श्रेय घेण्याची घाई झालेली. पण त्यामुळे केंद्र सरकारला अनेक प्रश्नांना सामोर जावं लागलं. भारत सरकारने ट्रम्प यांना हे श्रेय घेऊ दिलं नाही. भारत-पाकिस्तानने ठरवल्यामुळे शस्त्रसंधी झाल्याची भारताची भूमिका आहे. मात्र, तरीही डोनाल्ड ट्रम्प त्यांना वाट्टेल तेच बोलत आहेत.