डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराने केला नरेंद्र मोदी यांचा तो फोटो शेअर, भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण, थेट आरसाच…

टॅरिफच्या मुद्द्यावरून अनेक वर्षामधील भारत आणि पाकिस्तानमधील चांगले संंबंध ताणले गेले आहेत. वाद टोकाला पोहोचला आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार यांनी असे काही केले की, सोशल मीडियावर भारतीय लोक त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराने केला नरेंद्र मोदी यांचा तो फोटो शेअर, भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण, थेट आरसाच...
donald trump and narendra modi
| Updated on: Aug 29, 2025 | 6:38 PM

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर असून त्यानंतर ते लगेचच चीनच्या दाैऱ्यावर देखील जाणार आहेत. अमेरिकेच्या दादागिरीच्या विरोधात अनेक देश एकत्र येत आहेत. जगातील अनेक देशांवर अमेरिका रशियाकडून तेल न घेण्यासाठी दबाव टाकत आहे. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी करण्याचे परिणाम भारत भोगत आहे, तुम्हालाही त्या परिणामांना सामोरे जावे असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट जपानला पोहोचले आहेत.

नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय जपान दाैऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद जगाला दाखवून दिली आहे. मात्र, आता अमेरिकेचा जळफळाट उठल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांना सोशल मीडियावर भारताच्या युजर्सने चांगलेच फटकारले आहे. पीटर नवारो हे सातत्याने भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत.

भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, त्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी भारताला थेट नफेखोर म्हटले. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करून मोठी नफेखोरी करत आहे. भारताच्या युजर्सने नवारोच्या पोस्टवर सर्वाधिक आक्षेप आहे, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भगवे कपडे घातलेला फोटो वापरला आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, रशिया आणि युक्रेन युद्धाचा शांतीचा रस्ता हा नवी दिल्लीहून जातो.

नवारो यांच्या या पोस्टवर कमेंट करत एका भारतीय युजर्सने लिहिले की, वाह…डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार आता भारतावर निशाणा साधताना नरेंद्र मोदी यांचा ध्यान करतानाचा फोटो वापरत आहेत, हे लोक भारतासोबतचे सर्व संबंध खराब करत आहेत. दुसऱ्याने लिहिले की, आता ही बकवास सुरू झाली आहे, यामुळेच भारत आणि अमेरिकेतील संबंध खराब होत आहेत.

तिसऱ्याने लिहिले की, या लोकांनी भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध बनवायला लागलेली 25 वर्षांची मेहनत वाया घातली. अजून एका युजर्सने थेट म्हटले की, तुमच्याजवळ आरसा आहे? अमेरिका आताही रशियाकडून युरेनियम खनिजे खरेदी करते. हेच नाही तर पुनिनचे जोरदार स्वागत केले. हे देखील विसरले की, हे युद्ध अमेरिका-नाटोच्या कारणामुळे सुरू झाले. अमेरिकेने दहशतवादी देश पाकिस्तानसोबत व्यापार करार केला.